📰 ताज्या घडामोडी

सभापती कपिल आकात यांच्याकडून आर्थिक मदत

च
Shamsundar chittoda
1 मार्च 2022•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

तालुक्यातील दैठना खुर्द येथे घराला आग लागून नुकसान झाल्याने राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष तथा सभापती कपिल आकात यांनी भेट घेऊन पंचवीस हजार रुपये आर्थिक मदत केली आहे.

दत्ता विष्णु सवने यांचे घरी त्याची आईने गॅस पेटवूला असता गॅसचा भडका झाल्याने घरातील संस्कार उपयोगी साहित्य व नगदी रोख रक्कम जाळून खाक झाल्याची घटना दि २४ फेब्रुवारी २०२२ रोजी घडली होती.

अग्निशामक व गावकर्‍यांनी आग आटोक्यात आणली. गॅस टाकीचा विस्फोट न झाल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीत घरासह घरातील एक किंट्टल गहू, ज्वारी, किराणा, कपाट, कपडे, लोखंडी टीन पत्रे, व नगदी रोख रक्कम दोन लाख तीन हजार रुपये जाळून खाक झाले. या आगीत अंदाजे तीन ते साडेतीन लाख रुपयाचे नुकसान झाले होते. राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष तथा सभापती कपिल आकात यांनी दि १ मार्च २०२२ रोजी कुटुंबियांची भेट घेऊन पंचवीस हजार रुपयाचा आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला आहे. यावेळी बंडेराव सवने, अनिकेत नवल,सरपंच सोनाजी गाडेकर, ओमकर काटे, अंकुश शिंदे, मोहन बाण, वसंत सवने, सुरेश सवने, हरिभाऊ सवने, महादेव सवने, सुनील तायडे, दीपक सवने, दौलत सवने, संजय सवने, तातेराव सवने, दत्ता सवने, बाळासाहेब ताठे, अमोल सवने, विकास सवने, प्रयागबाई सवने यांच्यासह आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→1 मार्च 2022
परतूर तालुक्यात 4 हजारांवर बालकांनी घेतली पोलिओ लस

परतूर तालुक्यात 4 हजारांवर बालकांनी घेतली पोलिओ लस

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात