📰 ताज्या घडामोडी

वाटुर फाटा येथे उद्या भव्य रोको आंदोलन,सेवली येथील पूतळा हटवल्या प्रकरणी तळणी येथे कडकडीत बंद

Shamsundar chittoda
16 फेब्रुवारी 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

तळणी : (रवी पाटील )

तळणी येथून जवळच व जालना तालुक्यातील सेवली येथे अत्यंत शांततापूर्ण वातावरणात सर्व धर्मीय लोकप्रतिनिधी व समाज बांधवांच्या एकोप्यातून, सर्वानुमते कोणतीही तेढ निर्माण न होता महाराष्ट्राचं नव्हे तर अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करण्यात आलं होतं पूजन करणाऱ्यांमध्ये सर्व जाती-धर्माच्या शिवप्रेमींचा समावेश होता....

तळणी येथे या घटनेचा पूर्णपणे निषेध करण्यात आला असून सकाळ पासूनच पूर्ण बाजारपेठ बंद होती व्यापाऱ्यानी या बंद मध्ये सहभाग नोदवून जिल्हा प्रशासनाच्या या कृत्तीचा निषेध केला

*परंतु कोणताही वाद-विवाद नसताना संपूर्ण गावाची सहमती असताना सर्व लोकप्रतिनिधींची सहमती असताना कोणत्याही प्रकारची तक्रार नसताना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा रात्री हटवण्यात आला या गोष्टीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विनापरवानगी अनेक महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आलेले आहेत परंतु केवळ रजाकारी प्रवृत्तीच्या सरकारच्या आदेशाने हा पुतळा हटवण्यात आला ही बाब प्रत्येक शिवप्रेमींच्या मनाला लागणारी आणि भावना दुखावणारी आहे अशी प्रतीक्रीया माजी मंत्री बबन राव लोणीकर यानी तळणी येथे दीली*

या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ वाटुर फाटा या ठिकाणी *माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वात भव्य रास्ता रोको गुरुवारी करण्यात येणार आहे*

तळणी येथे झालेल्या निषेध बैठकीत आमदार बबनराव लोणीकरता गजानन देशमुख केशव महाराज सरकटे बबन दादा सरकटे नितीन सरकटे अशोक राठोड उपसरपंच सुधाकर सरकटे व मोठया प्रमाणात शिवप्रेमी हजर होते जिल्हा प्रशासनाचा निषेध म्हणून मंठा ता अध्यक्ष सतिशराव निर्वळ यांच्या नेतूत्वाखाली मंठा तहसीलदाराला निवेदन देऊन मंठा भाजपाच्या वतीने निषेध करण्यात आला

तळणी येथे शिवप्रेमीन कडून निषेध करण्यात आला

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात