📰 ताज्या घडामोडी

तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून नळडोह चा कायापालट करणार - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर,नळडोह येथे आमदार श्री.लोणीकर यांच्या हस्ते भव्य सभागृहाचे लोकार्पण

Shamsundar chittoda
16 फेब्रुवारी 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

मागील पंचवार्षिक मध्ये मंत्रिपदाच्या कार्यकाळात अनेक तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याची संधी मिळाली त्या माध्यमातून अनेक विकास कामे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी केली त्यातीलच मोठ्या सभागृहात पैकी एक असणारे सभागृह न डोह या ठिकाणी उभारण्याची संधी मला मिळाली भविष्यात देखील तीर्थ क्षेत्र विकासाच्या माध्यमातून नळडोह या तीर्थक्षेत्राचा कायापालट करण्यासाठी मी कायम तत्पर राहील असा विश्वास माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज नळडोह या ठिकाणी दिला.

मंठा तालुक्यातील नळडोह येथे संत जनार्दन महाराज संस्थान यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी श्री लोणीकर यांच्या हस्ते या सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले, श्री लोणीकर यांच्या विशेष निधीतून परतूर विधानसभा मतदार संघात २० पेक्षा अधिक मोठी सभागृहे देण्यात आली होत ०२ हजार पेक्षा अधिक लोक बसू शकतील अशा प्रकारचे मोठे सभागृह बांधकाम केल्यामुळे गोरगरीब लोकांच्या लग्नासाठी, मंदिराशी संबंधित वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी, तसेच महापुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या इत्यादी कार्यक्रमांसाठी भविष्यात मंडप लावण्याची गरज पडू नये व आर्थिक बचत व्हावी या उद्देशाने ही सभागृह बांधण्यात आली होती त्यातील मंठा तालुक्यातील नळडोह येथे २० लक्ष रुपये किमतीच्या मोठ्या सभागृहाचे लोकार्पण माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले

यावेळी विठ्ठल मामा काळे, गजानन देशमुख, प्रसादराव गडदे, संभाजीराजे खंदारे, ज्ञानेश्वर माऊली वायाळ, अशोक आप्पा सोनटक्के, विनायक आप्पा सोनटक्के, शिवशंकर डोईफोडे, माऊली राठोड, खोराड सावंगी सरपंच पंकज राठोड यांच्यासह संत जनार्दन महाराज संस्थान नळडोहचे भास्कर आप्पा सोनटक्के, अंशीराम थोरात, अशोक आप्पा सोनटक्के, कान्होबा थोरात, जिजाभाऊ गिराने, सुधाकर आप्पा सोनटक्के, उद्धवराव सोनकर, बाळासाहेब कौटकर, विनायक नरवाडे, परसराम लाखुळे, केजी वरणकर, गोबरा राठोड, ओमकार वरणकर, कैलास थोरात, ज्ञानेश्वर थोरात तसेेेच पंचक्रोशीतील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात