📰 ताज्या घडामोडी

तालुका कृषी अधिकारी व्ही. जे. राठोड यांची तळणी मंडळात भेट

Shamsundar chittoda
13 फेब्रुवारी 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

तळणी दि.13(रवी पाटील)

तालुका कृषी अधिकारी यांची तळणी मंडळात क्षेत्र भेट झाली दरम्यान तालुका कृषी अधिकारी श्री व्हीे जे राठोड यांनी मंडळा अंतर्गत मौजे तळणी येथे राबविण्यात आलेल्या बीजोत्पादन कार्यक्रमा अंतर्गत उन्हाळी सोयाबीन , राअसूअ अंतर्गत प्रकल्प भेट , कामगंध सापळे कार्यक्षमता चाचणी क्षेत्र भेट , रब्बी उन्हाळी पीक पाहणी क्षेत्र भेटी केल्या.

दरम्यान प्रकल्पातील जवारी फुले रेवती चे वान चांगले येण्याचे संकेत आढळून आले असून येत्या हंगामात नवीन जवरी बियाणे फुले संगम सारखे प्राप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान भाजीपाला बीजोत्पादन नर्सरी उत्पादक शेतकरी श्री अरुण आप्पा सरकटे यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देवून टोमॅटो, मिरची, टरबूज, कांदा इत्यादी बीजोत्पादन कार्यक्रमाची दखल घेतली या सर्व बीजोत्पादन चे माध्यमातून त्यांना प्रती शेडनेट 250000 रुपयाच्या लाभ अपेक्षित असून असे तीन शेडनेट आहेत, सोबत टरबूज पिकाचे २ एकर क्षेत्र असून 8 ते१० लाख रुपयाचे बीजोत्पादन अपेक्षित आहे. सोबत च कांदा पीक बीजोत्पादन चे क्षेत्र ३ एकर असून अंदाजे १० लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. एकूण त्यांना 20 लाखाचे उत्पन्न अपेक्षित असून त्यांची कृषी निष्ट पुरस्कार करिता शिफारस झाली आहे. ते आपल्या यशाचे श्रेय जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी , मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहायक तळणी यांना देतात . शेतकऱ्यांनी विविध डीबिटी आणि पोकरा योजना अंतर्गत योजनांचा लाभ घेवून आपले उत्पन्न वाढवावे आणि बीजोत्पादन कार्यक्रमा कडे वळून कमी क्षेत्रात , कमी पाण्यात जास्त उत्पन्न घ्यावे असे आवाहन केले आहे. दोन्ही योजना अंतर्गत शेडनेट करिता अनुक्रमे शासन मार्गदर्शक सूचना चे अधीन राहून अनुक्रमे 50 ते 70 % पर्यंत अनुदान मिळते. सदर भेटी दरम्यान , कृषी सहायक विजय खोडके, राजू इधोले,कृषी पर्यवेक्षक माऊली नाईक नवरे , सिदार्ध खाडे, मंडळ अधिकारी पवार इत्यादी उपस्थित होते.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात