📰 ताज्या घडामोडी

सातोना येथील यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये विक्रमी 172 रक्तदान

च
Shamsundar chittoda
20 फेब्रुवारी 2022•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

सातोना येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त यश अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड परतूर व बाजीराव पाटील आकात बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सातोना खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते. श्री ह. भ. प. बाळू महाराज गिरगावकर यांच्या शुभहस्ते फित कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व ज्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे चळवळ खऱ्या अर्थाने सुरू करून दिली असे स्वर्गीय महेश भाऊ सितारामजी आकात व दत्तात्रय सितारामजी आकात यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

यावेळी श्री ह. भ. प. बाळू महाराज गिरगावकर यांच्यासह परिसरातील 172 जणांनी रक्तदान केले.

दरम्यान यश प्रा .व मा. विद्यालयाचा माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर भागवतराव आकात याने वैद्यकीय पूर्वपरीक्षेत(एमबीबीएस) घवघवीत यश संपादन केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन पालकांसह गौरविण्यात आले.

यावेळी यश अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड परतूरचे चेअरमन बालासाहेब सितारामजी आकात, आसारामजी लाटे, इंद्रजीत घनवट, यश महेशराव आकात , बालासाहेब उद्धवराव आकात, संतोष आकात, अनिल बोराडे, जयराम खंदारे, जगनदादा आकात, शिवाजी महाराज, सतीश आकात ,डॉ.अंबादास टाले, माऊली आण्णा लाटे, डॉ संजय लाटे, बाबासाहेब लाटे, भांगे. यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामिर शेख यांनी तर आभार यश महेशराव आकात यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→20 फेब्रुवारी 2022
पोलिसांना हेल्पलाईन क्रमांक 112 वर कॉल करून खोटी माहिती दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल...

पोलिसांना हेल्पलाईन क्रमांक 112 वर कॉल करून खोटी माहिती दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल...

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात