📰 ताज्या घडामोडी

मतदार संघात 200 च्या वर मंदिरांना सभामंडप देऊन परमेश्वराची सेवा केली,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, माझ्यायावर पांडुरंगाची कृपा त्यामुळेच मी मंत्री झालो,परमार्थ आश्रम सोयंजना येथे सभामंडपा साठी 15 लक्ष रुपयाचा निधी

Shamsundar chittoda
23 फेब्रुवारी 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

मी गेली 35 वर्ष राजकारणाच्या माध्यमातून समाज सेवेबरोबरच ईश्वरी सेवेला वाहून घेतल्यानेच मंत्री पदापर्यंत पोहोचू शकलो माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या माणसाला केवळ पांडुरंगाचे कृपा आशीर्वादामुळे इथपर्यंत मजल मारता आल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले

ते परमार्थ आश्रम सोयंजना ता परतुर येथे गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त आयोजित द्वि दिवशीय किर्तन सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते या वेळी ह भ प रामराव महाराज ढोक, ह भ प भागवताचार्य हरिदास जी महाराज बद्रीनारायण ढवळे भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर, अशोकराव बुरकुले प्रदीप कुमार लड्डा, विक्रम माने सुरेश सोळंके नितीन जोगदंड संपत टकले शत्रुघन कणसे ओमप्रकाश बोरकर गजानन काळे श्यामसुंदर काळे केशव ढवळे विष्णू ढवळे यांची उपस्थिती होती

पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की मी मतदार संघाचा विकास करत असताना वाड्या-वस्त्या तांडे अशा 200 गावांमध्ये विविध मंदिरांसमोर सभामंडप बांधकाम केले तीर्थक्षेत्र विकास च्या माध्यमातून दैठणा गंगाभारती महाराज संस्थान येथे पावणे दोन कोटीचा निधी देऊन परिसराचा विकास केला कऱ्हाळा येथील करळेश्वर असेल गोखुरेश्वर असेल, निळकंठेश्वर यासह अनेक देवस्थानांचा तिर्थक्षेत्र विकासांतर्गत समावेश करून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असेही यावेळी आमदार लोणीकर यांनी संगीतले

======================

माझा वावर हा संत सज्जनांच्या सहवासात असल्यामुळे व मुळात माझ्या वडिलांचे वारकरी संप्रदायाचे संस्कार माझ्यावर असल्यामुळे मला लहानपणापासूनच अभंग हरिपाठ म्हणण्याची सवय असून मला 32 अभंग पाठ असल्याचेही यावेळी आवर्जून त्यांनी उपस्थितांना सांगितले

समाज सेवेला प्राधान्य देत असताना दीनदलित दुबळ्या ची सेवा माझ्या हातून घडावी यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहिलो ्यामुळेच परमेश्‍वरी कृपा माझ्यावर असून या कृपेमुळेच मी आज या उंचीपर्यंत पोहोचू शकलो मी दरवर्षी पंढरपूरला जाऊन पांडुरंगाची सेवा करत असतो मी मंत्री असताना पांडुरंगाच्या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवून माझ्या हातून पांडुरंगाने सेवा करून घेतली याचा आपल्याला सार्थ अभिमान असून आयुष्यात कधी कुणाला वाईट मार्गाला लावण्यासाठी राजकारणाचा वापर केला नाही असेही उद्गार यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी काढले

यावेळी तालुका अध्यक्ष रमेश भापकर बद्रीनारायण ढवळे गणपतराव टकले शत्रुघन कणसे रामप्रसाद थोरात रमेश राव आढाव नितीन राव जोगदंड गजाननराव कराळे ओम प्रकाश बोरकर विक्रम राव माने अशोकराव बरकुले पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती होती

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात