दि.9 मंठा शहरासह भागात कार्यरत असणारे अधिकारी-कर्मचारी हे मुख्यालय राहताना दिसून येत नाहीत. यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शासन निर्णयाप्रमाणे सर्वांना मुख्यालयी राहणे अनिवार्य आहे. तरीपण ही मुजोर अधिकारी-कर्मचारी या नियमाला जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. यामधील काही कर्मचारी आहे हे जालना,परभणी, नांदेड,औरंगाबाद,परतुर, लोणार,जिंतूर, सेलू, या ठिकाणाहून ये-जा करत असतात. त्यांच्या या येणे-जाणे करण्याच्या कारणामुळे हे कार्यालयीन वेळेवर हजर होत नाही. बाहेरगावी जाण्याचे असल्या कारणामुळे तर कार्यालयीन वेळेच्या अगोदर निघून जातात. यांच्या या असल्या वेळेमुळे लोकांची कामे वेळेवर होत नाहीत. तसेच बऱ्याच कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी हे हॉटेलमध्ये शोधावे लागतात. काही अधिकाऱ्यांनी तर कमालच केली आहे.चक्क स्वतःचे काम करण्यासाठी रोजंदारीवर ठराविक रक्कम देऊन माणसे ठेवलेली आहेत.तसेच खेड्यापाड्यातून येणाऱ्या लोकांना अधिकरी कर्मचारी कार्यालयात उपलब्ध नसल्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तरी संबंधित कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन त्या मुजोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकातून होत आहे.
मंठा तालुक्यातील बहुतांशी अधिकारी-कर्मचारी यांना मुख्यालय राहण्याची ॲलर्जी
आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा
सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.
इतर ताज्या बातम्या
सर्व बातम्या पहा ↗परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा