📰 ताज्या घडामोडी

जि.प.शाळा हेलस येथे विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप

च
Shamsundar chittoda
12 फेब्रुवारी 2022•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

मंठा(सुभाष वायाळ )

तालुक्यातील जि.प.उच्च प्रा.शा. हेलस येथे सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षातील पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश देण्यात आला.आताच शालेय व्यवस्थापन समितीची निवड झाली असून त्यामध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित अध्यक्ष सौं, सुरेखा राजेभाऊ खराबे उपाध्यक्ष श्री दिपक दत्ताराव खराबे व सर्व शालेय समितीचे सदस्य यांच्या शुभहस्ते गणवेश विद्यार्थ्यांना देण्यात आले यासाठी जि. प. उच्च प्राथमिक शाळा हेलस च्या सर्व शिक्षकवृंदांनी चांगले कार्य केल्याबद्दल गावकऱ्यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शालेय समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य भारतीय जनता युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष कैलास खराबेपाटील, शालेय समितीचे माजी अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर ( माऊली )खराबे पाटील ,पत्रकार बाळासाहेब खराबे पाटील, राजेभाऊ खराबे पाटील, उबेद पटेल व सर्व विद्यार्थी, शिक्षक, गावकरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया

आज शाळेतील पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना दिला जातो. विविध शैक्षणिक,सांस्कृतिक,गुणवत्ता विकासावर आधारित नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबविले जातात. हे सर्व नवनवीन उपक्रम शाळेत आयोजित करण्यासाठी व यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी पालक, प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक यांचा सहभाग असतो विविध उपक्रमांना विशेष सहकार्य शालेय व्यवस्थापन समिती करते, सर्वांच्या समन्वयामुळे आज शाळेत सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली आहे शिक्षकांची रिक्त पदे लवकरात लवकर भरल्या जावी. रिक्त पदांचे ग्रहण सुटता सुटेना शालेय व्यवस्थापन समिती वेळोवेळी सहकार्य करते त्यांचे मनापासून आभार मानतो पुढील काळात सहकार्य करतील अशी अपेक्षा करतो.

आर.बी.कुडे

मुख्यध्यापक :-जि.प.उच्च प्राथमिक शाळा हेलस ता.मंठा जि.जालना

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→11 फेब्रुवारी 2022
प्रत्येक जिल्ह्यात ‘एमआरआय’; तालुक्यांत ‘सीटी स्कॅन’, ‘डायलिसिस’’_राजेश टोपे (आरोग्यमंत्री तथा कुटुंबकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य)

प्रत्येक जिल्ह्यात ‘एमआरआय’; तालुक्यांत ‘सीटी स्कॅन’, ‘डायलिसिस’’_राजेश टोपे (आरोग्यमंत्री तथा कुटुंबकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य)

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात