📰 ताज्या घडामोडी

विद्यापीठ सुधारणा विधेयक मागे घ्या या मागणीसाठी शिक्षण मंत्र्यांना पाठवण्यात आले मेसेज,प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वात परतूर विधानसभा मतदार संघातून 5000 मेसेज

Shamsundar chittoda
10 जानेवारी 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर (हनूमंत दंवडे)

काल दिनांक 09 रोजी 10000 पोस्टकार्ड मुख्यमंत्र्यांना पाठवल्यानंतर आज दिनांक 10 रोजी युवा मोर्चा प्रदेश महामंत्री यांच्या नेतृत्वाखाली परतूर विधानसभा मतदार संघातून शिक्षण मंत्री उदय सामंत यांना 5000 मेसेजेस पाठवण्यात आले

हे मेसेज पाठवण्याचे सुरुवात युवा मोर्चा प्रदेश महामंत्री यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी एकाच वेळी आपल्या मोबाईल वरून मंत्री उदय सामंत यांना मेसेजेस पाठवत पवित्र विद्यापीठांना तुमच्या राजकारणाचा अड्डा बनवू नका विद्यापीठ सुधारणा विधेयक काळे विधेयक त्वरित मागे घ्या अशा प्रकारचा मेसेज प्रत्येकान पाठवला

=======================

*विद्यापीठ सुधारणा विधेयक मागे घेईपर्यंत आता माघार नाही*

*राहुल लोणीकर*

=======================

कालच आम्ही महाविद्यालयीन परिसरामध्ये बॅनर लावून राज्य सरकारच्या विद्यापीठ सुधारणा विधेयका संदर्भात जनजागृती सुरू केली व मुख्यमंत्र्यांना 10000 पोस्टकार्ड पाठवत जोरदार निदर्शने केली असे यावेळी बोलताना युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी सांगितले पुढे बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की हे विधेयक मागे घेईपर्यंत आता आपण माघार घेणार नसून आज मतदार संघातून 5000 मेसेजेस शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पाठवण्यात आलेले आहेत यापुढेही हा लढा टप्प्याटप्प्याने ठेऊ तीव्र करण्यात येणार असून सर्व स्तरातील विद्यार्थ्यांचा या काळ्या कायद्याविरोधात आक्रोश असून सरकारला मात्र आपल्या तुंबड्या भरण्यासाठी विद्यापीठांना राजकारण्याच्या हातातील बटिक बनवायचे आहे असा संतप्त सवाल यावेळी राहुल लोणीकर यांनी उपस्थित केला

=======================

*पुढील दोन दिवस जिल्हाभरातून हजारोम मेसेजेस मंत्री उदय सामंत यांना पाठवणार*

=======================

येत्या पुढील दोन दिवसांमध्ये जिल्ह्यासह राज्यभरातून मोठ्या संख्येने मेसेजेस मंत्री उदय सामंत यांना पाठविण्यात येणार असून आज परतूर येथून 5000 मेसेजेस मंत्री उदय सामंत यांना पाठवण्यात आले असल्याची माहिती यावेळी राहुल लोणीकर यांनी दिली पुढे ते म्हणाले की युवा कार्यकर्ते विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त मेसेजेस मंत्री उदय सामंत यांना पाठवावीत असे आवाहन यावेळी त्यांनी केले

पुढे बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारा विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक (काळे विधेयक) महविकास आघाडी सरकारने मुद्दाम घाई घाईने पारित करून घेतले. या माध्यमातून प्र.कुलपती हे नवीन पद तयार करून सन्मा कुलपतींचे अधिकार उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांना दिले जाणार आहेत.विद्यापीठांना राजकारणाचा अड्डा बनविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे त्या मुळे आमचा या विधेयकाला विरोध असून सरकारने विधेयक मागे घ्यावे या साठी आता आपण आर पारची लढाई लढण्याची वेळ आली आहे असे त्यांनी या वेळी सांगितले

यावेळी शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात