📰 ताज्या घडामोडी

तुकोबारांयानी कधीच काही देवाकडे काही मागीतले नाही हीच वृत्ती मनुष्याची असली पाहीजे -ह. भ.प. तुकाराम महाराज मुंढे

Shamsundar chittoda
27 जानेवारी 2022⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

तळणी (रवी पाटील ) मनुष्याच्या आयुष्यात कितीही मोठा सघर्ष करण्याची वेळ आली तरी किचतही न डगमगता त्या संकंटाला सामोरे जाण्याची वृती मनुष्यात असली पाहीजे पांडूरंगावरची नितांत असलेला भक्ती भावच त्याच्चा ईच्छा आकांशा पूर्ण करणारा असला तरी तुकोबारांयानी कधीच काही देवाकडे काही मागीतले नाही हीच वृत्ती मनुष्याची असली पाहीजे देवाकडे जाताना आपण काही मागायचे नसते आपल्या कर्मानुसार सर्व गोष्टीची उपलब्धतता होत असते त्या साठी मनुष्याने सांसांरीक आयुष्य जगत असताना समाधानी असले पाहीजे असे उदगार ह भ प तुकाराम महाराज मुंढे यानी व्यक्त केले तळणी येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्य चालू असलेल्या श्री संत तुकोंबारायांचे चरित्राचे कथन करत असुन सहाव्या दिवशी पंचक्रोशीतील अनेक जणांनी या चरित्राचा आस्वाद घेतला

प्रत्येक संकटाला सामोरे जाऊन स्वःतचे अस्तीत्व निर्माण करणारे जगदगुरू तुकोबाराय आपल्यासाठी पाचवा वेद म्हणून गाथा निर्माण केला तो गाथा आपल्यासाठी आदर्श आहे तो गाथा माथ्यात घेऊन आपले सांसारीक आयुष्य जगणे सध्याच्या युगात गरजेचे आहे तरच आपल्या पीढीसाठी आपण काहीतरी आदर्श समोर ठेवू शकूत संत तुकाराम यांचे आदर्श संत ज्ञानेश्वर संत नामदेवराय व अन्य संत मडळीचां आदर्श त्याच्या पूढे होता त्यानी दाखवलेल्या मार्गावर च आपण सध्या मार्गक्रमण करणे गरजेचे आहे वडीलोपार्जीत सावकरीला स्पर्श न करता त्याचा कधीच स्वीकार केला नाही त्या धनाची त्या श्रीमंतीची अपेक्षा तुकोबारांयानी कधी केला तुकोबारायांनी अभंग लिहीण्यासाठी संसार जाळला परतू आता संसार चालवण्यासाठी अंभग विकावे लागते ही शोकांतीका

तुकोबारायांच्या आयुष्यात त्यांच्या धर्मपत्नीला सुध्दा मोठे स्थान आहे ज्या तुकोबारायांनी पाडुंरग परत्माची भक्तीभावाने श्रध्देने भक्ती केली त्या तुकोबांरायांची भेट सुध्दा देवाने सहज भेट घेतली नाही पंरतू जीजाबाईच्या पायातील मोडलेला काटा काढण्यासाठी देव जीजाबाईना सहज भेटला देव जर जीजाबाईच्या पायाला स्पर्श करू शकतो म्हटल्यांवर त्या मातृ शक्तीचा किती मोठो असू शकतो यांचा विचार आपण करणे गरजेचे आहे तुकोबारायांना जेवण दील्याशिवाय जीजाबाई कधीच जेवल्या नाही त्या ऊलट आजची परिस्थीती खूप वेगळी आहे माता भगिनी संसारीक जीवनामध्ये जीजाबाईचा आदर्श घेतला पाहीजे तसाच आदर्श वन्य पक्ष्याकडून घेतला पाहीजे त्याना पोटाला लागेल तितकेच ते जमा करतात पंरतू मनुष्याला सांसारीक जीवनात लागलेली हाव भक्ती मार्गातील सर्वात मोठा अडसर आहे मनुष्याने संसारीक गरजेपूर त्या गोष्टीचा विचार केला पाहीजे ,

प्रत्येक मनुष्याच्या जीवनात सकटे येत असतात आणि ते निवारतात देखील त्यासाठी संयंम ठेवणे गरजेचे आहे ज्या प्रभू रामचंद्राना सकाळी राज्याभीषेक होणार होता त्या राज्याला वनवासात जावे लागले वयाच्या सतराव्या वर्षी बारा वाडयाची महाजन की घेऊन मिरवणारे तुकोबाराय जरीचा पटका घालून घोडयावर फेरफटका मारणारे तुकोबारायांना वयाच्या एकवीसव्या वर्षी राहायला घर राहीले नाही प्रंपचांचे झटके अयोध्येच्या रामाला देहुच्चा संत तुकोबारायांना चुकले नाही तर येथे तुमची आमची काय बिशाद आहे प्रांपचीक अडचणीतून त्यावर मात करून मनुष्याने मार्गक्रमण केले पाहीजे उध्दवस्त झालेला माणुस एक तर संत होईल नाही तर आत्महत्या करेल आणी संत ही झाला नाही आणी आत्महत्या ही नाही केली तर तो एक नंबरचा दांभीक झाल्याशिवाय राहणार नाही तुकोबारायांच्या उदार वृती मुळे स्वःतचे सर्व व्यवहारीक आयुष्य लोकाच्या सांसारीक आयुष्यासाठी दान दीले व स्वःतच्या संसारीक आयुष्य हे भगवतांच्या स्वाधीन दिले द्रढ भक्ती भाव व साधनेने देवाला आपलेस करणारे तुकोबाराय खऱ्या अर्थाने श्रीमंत होते ती श्रीमती आपल्याला ससारीक आयुष्यात स्वीकारायची असेल तर तुम्ही आम्ही तुकोबारायाच्या भक्ती मार्ग निवडा देव तुम्हाला नक्कीच आपलेसे केल्याशिवाय राहनार नाही

यावेळी महाराजांनी शेतकरी आत्महत्यावर सरकारच्या धोरणावर सुध्दा टीका केली निसर्गाच्या लहरी पणाचा फटका हा शेतकर्याच्या बसत असुन शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल ऊचलत आहे

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात