📰 ताज्या घडामोडी

तळणी येथे नूतन शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांच्या सत्कार संपन्न

Shamsundar chittoda
9 जानेवारी 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

तळणी (रवी पाटील):- मंठा तालुक्यातील तळणी येथील केंद्रीय प्राथमिक शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी भागवत शिवाजी मूर्तडकर तर उपाध्यक्षपदी सौ.मंगल प्रभुसिंग चव्हाण यांची निवड यांची करण्यात आली आहे. पालक सभेतून निवडलेल्या सदस्यांमधून सर्वानुमते ही निवड करण्यात आली आहे. शनिवारी कोरोना विषयक सर्व नियमावलीचे पालन करून शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. निवडी नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री.जे.डी. इंगळे सर यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांचा सत्कार केला आहे.

पालक सभेतून सदस्य निवडीनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला उपसरपंच श्री.सुधाकर सरकटे, ग्रामपंचायत सदस्य श्री.अमोल सरकटे, केंद्रीय मुख्याध्यापक श्री.जे.डी. इंगळे सर, शिक्षक आर.जी.खंदारे, डी. टी. शिंदे, पी.जे.वराडे, जी.ए. धारतरकर, एस.बी.गारोळे,ए. डी. आकाळ, एस.एस.येलेकर आदींसह गावकऱ्यांची उपस्थिती होती. नवनियुक्त शालेय व्यवस्थापन समिती मध्ये अध्यक्ष भागवत मूर्तडकर, उपाध्यक्ष सौ.मंगल चव्हाण, सदस्य सुप्रिया जोशी, सोपान सरकटे, सौ.सुनीता कुकडे, ज्ञानेश्वर चौकसकर,रफिक शेख,सौ.अनुराधा हानवते ,गजानन लाड, शिक्षणतज्ञ अमोल सरकटे यांचा समावेश आहे.

यावेळी सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. जे.डी.इंगळे सर तर प्रमुख पाहुणे उपसरपंच श्री.सुधाकर सरकटे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. वराडे सर यांनी केले.सूत्रसंचालन श्री.गारोळे सर यांनी तर आभार श्री.शिंदे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व पालक व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात