📰 ताज्या घडामोडी

श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर ( प्रथम) राज्याभिषेक दिन सोहळ्यास मोठ्या संख्येने सहभागी व्हा...

च
Shamsundar chittoda
4 जानेवारी 2022•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

दवंडे हनुमंत

आपला स्वाभिमान चला करू या महाराजांचा सन्मान इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे चक्रवती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन सोहळा दिनांक 6 जानेवारी रोजी वाफगाव किल्ल्यावर मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.पुणे जिल्ह्यातील वाफगाव येथे 9:30 वाजता विविध कार्यक्रमाने सुरुवात होणार आहे होळकर घराण्यातील व समस्त भारत वासियांच्या उपस्थितीत गाव दर्शन ,गड पूजन , ध्वजपूजन, ध्वजारोहण ,राज्याभिषेक तळी भंडार ,व महाराजांना अभिवादन असे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.अखंड भारत आणि Nation first, चा नारा देणारे देशाच्या इतिहासात इंग्रजांविरुद्ध सलग 18 लढाया अजिंक्य असणारे इंग्रजांना देशातून परतवून लावण्यासाठी देशातील सरदार- वतनदार -राजे यांना आपल्यातील वाद थांबवून इंग्रजांविरुद्ध एक होण्यासाठी प्रयत्न करणारे देशासाठी आणि देशाच्या अखंडतेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी आजीवन लढणारे आद्यस्वातंत्र्य योद्धे राजराजेश्वर श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन सोहळा हा दिवस सर्व भारतीयांसाठी प्रेरणा दिवस आहे. तरी सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान शिवाजी भालेकर (धनगर समाज उन्नती मंडळ जिल्हा अध्यक्ष तथा राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष) बाबु गोसावी वंचित बहुजन आघाडी ता. अध्यक्ष परतुर, हनुमंत दवंडे धनगर समाज उन्नती मंडळ ता.परतूर तथा मौर्य क्रांती संघ तालुकाध्यक्ष परतूर) नामदेवराव गोरे रासपा परतुर, भगवान पाटोळे,प्रकाश दिवटे, संपत बानगावडे ,योगेश गायकवाड ,कृष्णा गायकवाड, योगेश भले ,नंदकुमार गांजे धनगर समाज उन्नती मंडळ परतुर, डिगंबर भले ,रामेश्वर भले, माऊली सागुते , विलास रोकडे, विष्णू गुंजाळ , सोमेश्वर गायकवाड, सोपान गोरे, दादाराव बकाल, रामेश्वर दुगाने, असे आवाहन यांनीकेले आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→4 जानेवारी 2022
देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल परतुर येथे क्रांती ज्योती

देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल परतुर येथे क्रांती ज्योती

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात