📰 ताज्या घडामोडी

परतूर तालुक्यात नवीन साखर कारखाना निर्माण होणार... मनसे नेते दिलीप- बापु धोत्रे===============

Shamsundar chittoda
30 जानेवारी 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर /हनुमंत दवंडे

मराठवाडा दौरयाच्या अनुषंगाने,दि.३० जानेवारी रोजी जालना जिल्ह्यातील परतूर मंठा तालुक्यातील परतूर शहरातील शासकीय विश्रामगृहमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक मनसे नेते मा.दिलीप(बापू)धोत्रे, मार्गदर्शन करताना म्हणाले की परतूर मंठा तालुक्यातील स उत्पादक शेतकर्‍यांचा प्रश्न लक्षात घेता परतूर मंठा तालुक्यात नवीन साखर कारखाना निर्माण करण्याची इच्छा आहे,लवकरच साखर उद्योग सुरू करु असंही धोत्रे म्हणाले, श्री धोत्रे यांच्या कडे पंढरपूर सोलापूर धाराशिव या ठिकाणी त्यांच्या मालकीचे दोन साखर कारखाने आहेत, त्यांनी मागच्या आठवड्यात पंढरपूर येथे इथेनॉल प्रकल्पाचे भूमिपूजन करून प्रकल्पाला सुरुवात केली आहे, पक्ष वाढविण्याच्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शक केले, प्रदेश सरचिटणीस मा.संतोष(भाऊ)नागरगोजे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.यावेळी जालना जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके, बालाजी मुंडे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना राज्य उपाध्यक्ष,परभणी जिल्हाध्यक्ष राज शेख,परभणी परभणी जिल्हाध्यक्ष गणेश सुरवसे, रामजी नवल जिल्हा उपाध्यक्ष,मंठापरतूर तालुका अध्यक्ष कृष्णा गोवर्धन सोळंके,मंठा तालुका अध्यक्ष गणेश ज्ञानेश्वर बोराडे,परतूर तालुका संघटक वैजनाथ बन,तालुका उपाध्यक्ष भारत शेळके,परतूर शहराध्यक्ष सोपान गोरे,उपशहराध्यक्ष विश्वंभर कुलकर्णी, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर केवारे,विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष महेश धापसे,माजी जिल्हाउपाध्यक्ष ऍड.राजेश खरात,रामेश्वर घुंगराट, सवाईराम राठोड,विलास काळे शाम देवडे,मंठा माजी शहराध्यक्ष संजय हानवते,आदित्य केंदळे अर्जुन मोहिते, तुकाराम कदम, अर्जुन नवले, गजानन झोल, अमोल सरोदे, मोहन सरोदे,राम गटकळ, कृष्णा बापु सोळंके यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते, मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते...

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात