📰 ताज्या घडामोडी

मनुष्याचे शब्दरूपी कार्य विसरते मात्र कृती जीवंत राहते हभप भगवताचा-र्य - रूपालीताई सवने

Shamsundar chittoda
18 जानेवारी 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर –

हनूमंत दंवडे

समाजात वावरत असतांना मनुष्याने केलेली शब्दरूपी मदत विसरू शकते मात्र कृतीतून केलेली मदत कायम स्मरणात जीवंत राहते असे प्रतिपादन हभप भागवताचा-र्य रूपालीताई सवने यांनी केले. लॉयन्स क्लब परतूरच्या वतीने हभप रूपाली सवने व बाल कवियत्री श्रावणी बरकुले यांचा सन्मान करून सत्कार प्रसंगी बोलतांना रूपाली सवने यांनी केले.

यावेळी पुढे बोलतांना हभप रूपालीताई सवने म्हनाल्या की पीडितांचे दुखदूर करण्यासाठी समाज प्रबोधनातून कार्य केले जाते. प्रबोधनातून सांगितलेले कार्य समाज विसरू शकतो मात्र कृतीतून केलेले कार्य मनुष्याच्या कायम स्मरणात राहते ते कार्य आज लॉयन्स क्लबच्या माध्यमातून नेत्रसेवेचे कार्य होत असून समाज हे कार्य कदापि विसरू शकत नाही. लॉयन्स क्लब आज समाजातील वंचित घटकांना सेवा कार्य करून त्यांना नवी दुर्ष्टी देण्याचे कार्य नव्या जगाची ओळख त्यांना या माध्यमातून देत आहे. गरजू पीडितांना मदत करणे आणि माणुसकी प्रत्येकांच्या मनात जागवणे हाच खरा परमार्थ असल्याचे वारकरी संप्रदाय सांगत आहे. प्रत्येकाने गरजू आणि पीडितांना मदत करण्याचे आवाहन हभप सवने केले. तर याप्रसंगी लॉयन्स क्लबचे मनोहर खालापुरे यांनी बोलतांना सांगितले की आज पर्यंत पस्तीस हजार पेक्षा अधिक रुग्णाची नेत्र तपासणी करून आठ हजार रुग्णाच्या डोळ्याच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत. यापुढे पुढील वर्षात परतूर शहरात लॉयन्स क्लबच्या माध्यमातून डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी या कार्यक्रमाला रामेश्वर नळगे, मनोहर खालापुरे, संजीवनी खालापुरे, रेवती राखे, अमित खालापुरे, डॉ. सुनीता खालापुरे, हभप रामेश्वर महाराज सवने, संदीप दाभाडे, रामेश्वर राजबिंडे, शाम बरकुले, प्रमोद टेकाळे, प्रशांत राखे, बोराडे, सोपान बोराडे, सुनील खालापुरे, डॉ काळे, डॉ गायकवाड, गणेश हारकळ, चौधरी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात