📰 ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद शाळेतील मुले पी.एच.डी.धारक शिक्षकाच्या हाताखालील गिरवताहेत अ,ब,क,ड..

Shamsundar chittoda
2 जानेवारी 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

मंठा (सुभाष वायाळ)

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.पूर्वीच्या काळी महाराष्ट्रात गुरुकुल शिक्षणपद्धत अस्तित्वात होती.पुढे काळाच्या ओघात शिक्षण पद्धतीमध्ये बदल होत गेले. त्यामध्ये शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा सुरू झाल्या कालांतराने लोक खाजगी शाळा व शासकीय शाळांमध्ये तुलना करू लागले. एक अलिखितनियम असा नियम रूढ झाला की, श्रीमंताची मुले खाजगी शाळेमध्ये व गरिबांची मुले शासकीय म्हणजेच जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, वस्तीशाळा अशा शाळेमध्ये त्यामध्ये खाजगी शाळा म्हणजे सुसज्ज इमारत, श्रीमंतांची मुले, सर्व भौतिक सुविधायुक्त, विद्यार्थी व शिक्षक मध्ये नीटनेटकेपणा, स्कूल बस, किंवा ने आण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या चारचाकी गाड्या, अभ्यासासाठी टॅब,लॅपटॉप, डिजिटल टीचिंग बोर्ड, अशा असंख्य गोष्टी खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये सहज उपलब्ध होतात,सहाजिकच या सर्व गोष्टींमुळे लोकांचा लोंढा हा या शाळेकडे वळाला. परंतु याच्या उलट जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, वस्तीशाळा वार्ड वार्ड मध्ये व गावागावांमध्ये असणारे गलिच्छ राजकारण व्यवस्थापनाच्या नावाखाली शाळेमध्ये सर्रास केले जाते. तसेच भौतिक सुविधेचा अभाव, विजेचा प्रश्न, मोडकळीस आलेल्या इमारती, काही ठिकाणी पालकांचा अडाणीपणा, शिक्षकांना शाळा व्यतिरिक्त कामे, शिक्षकांची कमतरता, या अशा असंख्य अडचणींवर मात करून शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च मानली जाणारी पदवी म्हणजेच डॉक्टरेट व तीही जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षकांनी मिळवणे म्हणजेच विदेशातील शिक्षण पद्धतीलाही लाजवेल अशी कामगिरी करणारे शिक्षक ही जिल्हा परिषद शाळेमध्ये असतात हे दाखवून देणारे असे अवलिया शिक्षक मंठा तालुक्यामध्ये आहेत आणि त्यांचे नाव आहे. डॉ. गोपाल विठोबा तुपकर त्यांचे शिक्षण एम.ए.इतिहास, मराठी, राज्यशास्त्र, डी.एड.,बी.एड. एक संवेदनशील लेखक,कवी, तसेच सामाजिक कार्याची आवड असणारे समाज सेवक त्यांचे आतापर्यंत तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यामध्ये 1) अंतरीचे शब्दफुले,2) रंग भावनाचे तसेच अनेक वृत्तपत्रांमध्ये सुद्धा लेख प्रकाशित झालेले आहे. असे हे सर्व गुण संपन्न असणारे शिक्षक मंठा तालुक्या पासून 12 किलोमीटर असणाऱ्या माळतोंडी या गावाला लाभलेली आहेत. जिल्हा परिषद च्या शाळेमध्ये असणाऱ्या असंख्य अडचणीवर मात करून उच्चशिक्षित असूनही कुठल्याही प्रकारचा मीपणा न ठेवता विद्यार्थीप्रिय असलेले शिक्षक जिल्हा परिषद सारख्या शाळेला मिळणे म्हणजे भाग्यच समजावे लागेल. विद्यार्थ्यांमध्ये एकरूप होऊन त्यांना बाराखडी,उजळणी,इंग्रजी,मराठी कविता खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शिकवतात. व त्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक, गुणवत्ता विकास हे एकच ध्येय समोर ठेवून या शिक्षकाचे काम अविरतपणे चालू आहे. त्यांच्या या कार्याची दखल राज्य शासनाने घ्यावी. अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.त्यांच्या या कार्याला शुभेच्छा !

शब्दांकन- प्रा.सतीश वैद्य

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात