📰 ताज्या घडामोडी

जय जवान, जय किसान' संघटनेची बैठक संपन्न

Shamsundar chittoda
14 जानेवारी 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

जालना (समाधान खरात)शासकीय विश्रामगृह जालना येथे 'जय जवान, जय किसान' संघटनेची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीचे

आयोजन जय जवान जय किसान संघटनेचे जालना जिल्ह्याध्यक्ष ज्ञानेश्वर भुसारे यांनी केले होते. या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून जय जवान जय किसान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत हे उपस्थित होते. त्यांनी या ठिकाणी आलेल्या संघटनेच्या सैनिकांना मार्गदर्शन केले.

ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले की, जय जवान जय किसान या संघटनेच्या माध्यमातून शेतकरी व तरुणांसाठी खूपच चांगल्या प्रकारे काम जालना जिल्ह्यात सुरु आहेत. आपल्या संघटनेची व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे. सतत आपण आपले काम सातत्याने सुरू ठेवणे गरजेचे आहे. आपण समाजात काम जर सुरू ठेवले तरच आपली प्रगती होईल व आपल्या संघटनेचे काम पण चांगल्या प्रकारे सुरू ठेवता येईल. आपल्या संघटनेच्या प्रत्येक सैनिकांने कोणत्याही कामात स्वतः पुढाकार घेणे गरजेचे आहे. सतत समाजात महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी व शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण होत आहेत. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपण लढले पाहिजे. गोरगरिबांच्या मदतीसाठी आपण सतत धावले पाहिजे तरच आपण जय जवान जय किसान संघटनेचे सैनिक आपल्या म्हणता येईल. आपल्या कामाची समाजावर छाप पडली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी 'जय जवान, जय किसान' या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत व तसेच मराठवाडा अध्यक्ष हनुमान कदम व जालना जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भुसारे यांच्या हस्ते जालना तालुकाध्यक्ष प्रल्हाद ढवळे, जालना सचिव गजानन शेजुळ व घांसावगी तालुकाध्यक्ष गणेश कोरडे यानां संघटनेची नियुक्ती पत्र देण्यात आले. नियुक्ती झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला अभिषेक वडगांवकर, अमोल चोथे, रमेश शिंदे, विष्णू पाटील, प्रल्हाद ढवळे, रवि सुरसे, राजेश काळे, रमेश खेत्रे, गजानन शेजुळ, तेजराव गंगावणे, राहुल बोबडे, कमांडो पद्माकर चंदनशिवे व डी.एफ.निंबाळकर यांची उपस्थिती

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात