📰 ताज्या घडामोडी

८९ च्या बॅच च्या वतीनेजि.प प्रशालेच्या गुणवंतांचा सत्कार

Shamsundar chittoda
27 जानेवारी 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर: हनुमंत दवंडे

येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या सन 89 90 या वर्षीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या वतीने डॉक्टर सतीश लालचंद मुंदडा यांच्या तर्फे प्रति वर्षी जिल्हा परिषद प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार केला जातो. यावर्षीही प्रशालेच्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात वर्षभरात शालेय शिस्त, अभ्यास, वर्तणूक, वर्षभरातील शालेय सहभाग, शालेय शिष्टाचार या सर्व गुणसंपन्न असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येऊन पुरस्कार दिला जातो, यावर्षी निवड झालेल्या विद्यार्थी मध्ये प्रथम पारितोषिक प्रांजल पेंदु मैसनवाड(वर्ग१०वि), तर दितीय ऋतुजा भास्कर घोडके(वर्ग१०वि), तर नववी वर्गातील कुमारी प्रतीक्षा सुरेश भुम्बर या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच या वेळी ८९ बॅच चे माजी विद्यार्थी राहुल कुंपावत यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वाचनासाठी भावी जीवन उज्वल करण्यासाठी मार्गदर्शन करणारे पुस्तके शाळेला मुकुंद देशमुख यांचे हस्ते भेट दिले.

या कार्यक्रमाला भाजपाचे ज्येष्ठ नेते भगवानराव मोरे, द.या. काटे, ८९-९० बॅचचे माजी विद्यार्थी मुकुंद देशमुख, संतोष शर्मा, मुख्याध्यापक विष्णू कदम सर शालेय समिती सदस्य ज्ञानेश्वर बरिदे, सविता कांबळे, शाळेचे शिक्षक लिंगनवाड सर, गणेश राठोड, देविदास आठवे, अरुण भांडवलकर, कैलास गाडगे, सतीश नाईक, खलील देशमुख, शिलेवार मॅडम, माने मॅडम, कोळकर मॅडम, आदींची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाकांत बरिदे सर यांनी केले तर शेवटी कैलास गाडगे यांनी आभार मानले.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात