📰 ताज्या घडामोडी

आपला देश लवकरच कोरोना मुक्त होईल. तहसिलदार रुपा चित्रक.

Shamsundar chittoda
11 जानेवारी 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

परतुर (हनूमंत दंवडे)

संपुर्ण जगात थैमान घालणार्या कोरोना या आजारातुन आपला देश लवकरच मुक्त होईल असा आशावाद परतुरच्या तहसिलदार रुपा चित्रक यांनी व्यक्त केला. आपल्या देशातील लोकसंख्येची घनता व लोकसंख्या मोठी असुनही सामाजिक अंतर व प्रभावीपणे राबण्यात येणारी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम या मुळे हे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले .

पाटोदा[माव] येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयातील पंधरा ते अठरा या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसिकरण कार्यक्रमाचे ऊद्घाटण प्रसंगी त्या बोलत होत्या. शिक्षक - पालक - संस्थाचालक यांच्या सहकार्यातुन या वयोगटातील संपुर्ण विद्यार्थ्यांचे लसीकरण आपण पुर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले .

या कार्यक्रमाची सुरूवात भारत मातेची प्रतीमा पुजन करुन झाली.

कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी नेहा पुजरवाड यांनी लसीकरणाबाबत अनेक शंकाचे निरसन करुन लसीकरणाचे महत्व पटवुन सांगितले .कोणतीही शंका मनात न बाळगता पालकांनी आपल्या पाल्यास लसीकरणासाठी प्रोत्साहीत करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

दरम्यान आज रोजी वर्ग नववी व दहावी मधील श्याहाशि [86] विद्यार्थ्यांना कोव्हॕक्सीन ही लस देण्यात आली.

कार्यक्रमास शिक्षण मंडळाचे ऊपाध्यक्ष तुळशिदासजी खवल ,आरोग्य रक्षक आर.आर. तोटे, जी.बी.बुधवंत , आरोग्य सेवक पि.एम.प्रधान ,आरोग्य सेविका श्रीमती एल.एस.वैद्य,मंडळाधीकारी शरद कुळकर्णी,कृष्णाजी सोनवने ,पालक प्रतिनीधी दिनेश खवल, छबुराव मुंढे,बालासाहेब नखाते,भिमराव शिंदे,सदाशीव खवल,मुख्याध्यापक अंभोरे सर आदी पस्थीत होते.

कार्यक्रमाचे प्रास्तावीक मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर यांनी तर सुत्र संचालन चत्रभुज खवल यांनी केले शेवटी आभार प्रदर्शन पाराजी रोकडे यांनी केले.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात