📰 ताज्या घडामोडी

सतिश खरात यांना "राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार" जाहीर.

च
Shamsundar chittoda
27 डिसेंबर 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

मंठा(सूभाष वायाळ)

दि.26 मंठा येथील सुप्रसिद्ध नाट्यकलावंत सतिश खरात यांना कलावंत विचार मंच व कमल फिल्म प्रॉडक्शन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने "राज्यस्तरीय कलावंत" हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून तो भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, लोककवी वामनदादा कर्डक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे , शाहीर अमर शेख, कवी वसंत बापट, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त नाशिक येथे देण्यात येणार असल्याचे कलावंत मंचचे अध्यक्ष सुनील मोंढे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

मंठा तालुक्यातील लिंबेवडगावसारख्या एका छोट्याशा खेडेगावात राहून नाट्यकलावंत सतिश खरात यांनी पुणे, मुंबई, कोकण मधील दिग्गज कलाकारांसोबत नाट्यरंगभूमीवर ऐतिहासिक पात्राच्या भूमिका वठवल्या आहेत शिवाय नाट्यलेखन, दिग्दर्शन व अभिनयासोबतच अनेक लघुचित्रपटाची निर्मितीही केली आहे.

मध्यमहाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व कोकणभूमीत वाड्या-तांड्यावरील शाळेतून विद्यार्थ्यांना नाट्यकलेचे प्रशिक्षण देण्यासाठीही त्यांनी सतत भ्रमंती केली आहे.

या अगोदर त्यांना "आविष्कार गौरव २०२१" या राज्यस्तरीय पुरस्कारानेही गाैरवण्यात आले आहे. सतिश खरात यांची नाट्यक्षेत्रातील एक हरहुन्नरी कलावंत म्हणून त्यांच्या कारकीर्दीची दखल घेऊन "राज्यस्तरीय कलावंत " हा सन्मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

या पुरस्काराबद्दल त्यांचे नातेवाईक व मित्र परिवाराकडून महाराष्ट्रातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→25 डिसेंबर 2021
वीष्णू कदम यांचा दादर येथे  सत्कार

वीष्णू कदम यांचा दादर येथे सत्कार

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात