मंठा- (सुभाष वायाळ)दि.20 बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील भाग 4 कलम 21 नुसार प्रत्येक शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. मंठा तालुक्यातील बहुतांशी शाळातील शालेय व्यवस्थापन समितीची मुदत संपलेली आहे. तरीपण नवीन शालेय व्यवस्थापन समिती स्थापन करण्यामध्ये संबंधित शाळा, मुख्याध्यापक, संस्थाध्यक्ष, केंद्रप्रमुख वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये उत्सुकता दिसून येत नाही. व शासनाच्या नियमाला जुमानत नसल्याचे आवआणताना दिसून येत आहेत. शासनाने शालेय गुणवत्ता वाढवावी व मुलांचे भवितव्य उज्वल व्हावे. व शालेय व्यवस्थापनामध्ये पारदर्शकता यावी. शाळाबाह्य व अपंग मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणणे, पायाभूत व भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे, शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, शिक्षकांच्या समस्याचे निराकरण करणे व त्यांच्या कर्तव्याचा पाठपुरावा करणे,शालेय विकास आराखडा तयार करणे, यासाठी शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात यावी. असा नियम लागू केला आहे. परंतु मंठा तालुक्यामध्ये बहुतांशी शाळांमध्ये या नियमाला केराची टोपली दाखवताना दिसून येत आहेत. ही समिती म्हणजे तालुक्यातील शाळांना अडचण झाल्याची दिसून येत आहे. व त्या कारणामुळेच समिती स्थापन करण्यामध्ये टाळाटाळ करताना दिसून येत आहेत. तरी संबंधित वरिष्ठ विभागाने याकडे लक्ष द्यावे व शालेय गुणवत्ता वाढवण्यास मदत करावी. अशी मागणी नागरिक करत आहेत.
मंठा तालुक्यातील शाळांना शालेय व्यवस्थापन समितीच वावड
आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा
सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.
इतर ताज्या बातम्या
सर्व बातम्या पहा ↗परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा