📰 ताज्या घडामोडी

दत्त जयंती निमित्त गिरगावकर महाराजांचे किर्तन

च
Shamsundar chittoda
17 डिसेंबर 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर : (प्रतीनीधी)

तालुक्यातील हरेराम नगर येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही दत्त जयंती निमित्त दी१८-१२-२०२१ रोजी वार शनिवारी सकाळी १०:३० वाजता बाळू महाराज गिरगावकर यांच्या काल्याच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक तथा भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे यांनी केले आहे.

रामराव कणसे यांनी १९५८मध्ये हरेराम नगर येथील सुरु केलेल्या दत्त जयंती उत्सवाला अनेक वर्षांची परंपरा असून आता पर्यंत अनेक मान्यवर किर्तनकरांनी या उत्सवात आपली कीर्तन सेवा दिली आहे. हरेराम नगर येथील कणसे कुटुंबीयांकडे या उत्सवाचे यजमान पद आहे.

दत्त जयंतीला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. यंदा कोरोना विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर कोरोना विषयक नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा केला जाणार आहे. कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कणसे यांनी केले आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→17 डिसेंबर 2021
तळणी परीसरात तुरीच्या पीकाच्या तुऱ्हाटया झाल्या

तळणी परीसरात तुरीच्या पीकाच्या तुऱ्हाटया झाल्या

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात