📰 ताज्या घडामोडी

बदनापूर नगर पंचायत निवडणूकवॉर्ड क्रमांक १२ मध्ये भाजप आणि आघाडीत मारामारी!,इतर ठिकाणी शांततेत मतदान, ७७ टक्के मतदान

Shamsundar chittoda
22 डिसेंबर 2021⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

बदनापूर(समाधान खरात)

नगर पंचायत निवडणूक च्या मतदानाची रणधुमाडी आटोक्यात आली असून आज बदनापूर शहरातील १२ वॉर्डात ७७ टक्के मतदान झाले आहे या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त केला होता शहरात पोलिसांनी पोलीस निरीक्षक शिवाजी बंडेवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक केंद्रात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तरीही वॉर्ड क्रमांक १२ च्या मोसंबी संशोधन केंद्र येथे मतदाना दरम्यान महाआघाडी आणि भाजपा च्या कार्यकर्त्यांत बोगस मतदानावरून तुंबळ हाणामारी झाली यात भाजप चे कार्यकर्ते बोगस मतदान करत असल्याचे महाआघाडीच्या कार्यकर्त्यांना निदर्शनास आले असता ते एकमेकांत भिडले

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला

बाकी इतर मतदान केंद्रावर शांततेने मतदान झाले

शहरातील संपूर्ण १७ वॉर्ड साठी मतदान होणार होते परंतु मा कोर्टाच्या आदेशाने ओबीसी ठिकाणी मतदान स्थगित केले होते त्यामुळे १३ वॉर्डात मतदान होणार असल्याने वॉर्ड क्रमांक ८ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या एक उमेदवार बिनविरोध निवडुन आल्याने बाकी १२ वॉर्डात ७७ टक्के मतदान झाले

संपूर्ण मतदान केंद्रात अतिरिक्त पोलीस मागवून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता

उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून येत्या १९ जानेवारी ला संपूर्ण १६ वॉर्ड ची मतगणना होणार आहे

कोण कोणत्या वॉर्डातून निवडून येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे ठिकठिकाणी दोन तीन जण निवडणूक विषयी चर्चा करतांना दिसत आहे शेवटी आता मतदारांनी आपले हक्क बजावून मतदान यंत्रात सीलबंद केले आहे

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात