📰 ताज्या घडामोडी

मंठा तालुक्यातील तळणी प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ कंत्राटी भरती करा- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी

च
Shamsundar chittoda
16 नोव्हेंबर 2021•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

मंठा (सुभाष वायाळ)

-दि.15 तळणी हे मंठा तालुक्यातील सर्वात शेवटचे विदर्भाच्या सिमेजवळील गाव असून या ठिकाणी आरोग्य सुविधांचा खूप मोठा अभाव आहे परिसरातील साधारणता ४० पेक्षा अधिक गावांची बाजारपेठ म्हणून तळणी या गावाकडे बघितले जाते शासनाने खूप मोठा खर्च करत भौतिक सुविधा उपलब्ध करून दिले आहे परंतु कर्मचारी नसल्यामुळे रुग्णांची मोठी अडचण झाली आहे अशा परिस्थितीत कंत्राटी स्वरूपात कर्मचाऱ्यांची तात्काळ भरती करण्यात यावी. अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे केली आहे

मागील पंचवार्षिक मध्ये लोणीकर यांनी स्वतः प्रयत्नपुर्वक तळणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून घेतले त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला व प्राथमिक आरोग्य केंद्राची भव्य इमारत उभी राहिली आहे परंतु अद्याप पर्यंत त्या आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली नाही परिणामी परिसरातील नागरिकांची व रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे असेही लोणीकर यांनी पत्रात म्हटले आहे

परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत, भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या असल्या तरी त्या वापरण्यासाठी लागणारे मनुष्यबळ मात्र उपलब्ध नाही. या प्राथमिक आरोग्य केंद्रावर ६ उपकेंद्र अवलंबून आहेत त्यामध्ये वझर सरकटे, बेलोरा, देवठाणा ऊस्वद, शिरपूर व तळणी या उपकेंद्रांचा समावेश आहे औषधोपचारांसाठी दहिफळ खंदारे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या मेहनतीने मंजूर करून भव्य स्वरूपात उभारणी केले हे प्राथमिक आरोग्य केंद्र केवळ शोभेची वस्तू बनणे योग्य नाही. असेही लोणीकर यांनी पत्रात नमूद केले आहे

या प्राथमिक आरोग्य केंद्रात २ वैद्यकीय अधिकारी, १ सुपरवायझर, १ लॅब टेक्निशियन, १ आरोग्य निर्माता, ४ आरोग्य सेवक, २ आरोग्य सेविका, ३ शिपाई ही पदे तात्काळ भरण्यात आवश्यक आहे त्याकरिता कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करून परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच योग्य ती कार्यवाही प्रशासनाकडून केली जाईल जिल्हाधिकार्‍यांना बरोबरच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी यात लक्ष घालावे व कंत्राटी भरतीची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी अशी अपेक्षा लोणीकर यांनी व्यक्त केली आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→15 नोव्हेंबर 2021
एसटी महामंडळाचे शासकिय सेवेत विलीनीकरण करा    मनसे विद्यार्थी सेनेचे ठिय्या आंदोलन

एसटी महामंडळाचे शासकिय सेवेत विलीनीकरण करा मनसे विद्यार्थी सेनेचे ठिय्या आंदोलन

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात