📰 ताज्या घडामोडी

मंठा-परतुर आगारातील एसटी कर्मचार्‍यांच्या संपाने प्रवाशांची गैरसोय ; खाजगी वाहतूकीनी केली आथिँक आडवणुक

Shamsundar chittoda
9 नोव्हेंबर 2021⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

मंठा (सुभाष वायाळ) राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य भर चालु असलेल्या अनेक दिवसाच्या संपात सोमवार पासुन परतुर -मंठा परिवहन महामंडळ विभागातील कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी सुरु केलेल्या संपाने एसटीच्या बसेसची वाहतूक पुर्णतः ठप्प आहे. परिणामी हजारो प्रवाशांची सणासुदीच्या काळात मोठी हेळसांड होत आहे. सोमवार पासून एसटी बस वाहतूक कोलमडली आहे. त्यामुळेच सणासुदीत हजारो प्रवाशी अक्षरशः हैराण आहेत. आज ना उद्या संप मिटेल, बस वाहतूक सुरु होईल, या अपेक्षापोटी

प्रवाशांनी लांब पल्ल्याच्या गाड्यांचा प्रवास टाळला. परंतु, संपकरी व सरकार यांच्यात कोणतीही तडजोड होईनाशी झाली आहे. परिणामी एसटीची चाके जागच्या जागीच ठप्प आहेत. या दरम्यान औरंगाबाद ,मुंबई, पुणे, नागपूर या महानगरांकडील तसेच नगर,अमरावती वगैरे भागातील ये-जा करणारी वाहतूक बंद आहे. प्रवाशांचे हाल सुरु आहेत. खाजगी वाहतूकीने संपाच्या या पार्श्‍वभूमीवर प्रवाशांची मोठी लूट सुरु केली आहे. ते पुणे, नागपूर, मुंबई वगैरे भागात ये-जा करण्याकरीता आव्वा की सव्वा दर आकारले जात आहेत. त्यातच कहर म्हणजे खाजगी वाहतूकीने डिझेलच्या दरवाढीपाठोपाठ या संपाचा लाभ उठविण्याकरीता दर वाढवून ठेवले आहेत. या प्रकाराने प्रवाशी हतबल झाले आहेत.सध्या सनासुदीचे दिवस असल्याने खेड्यापाडयातुन येताना अक्षरशः मोटारसायकलद्वारे प्रवाशी वाहतूक सुरु झाली आहे.तसेच खेड्यातील लोकांना शहरात येताना खुप ञास सहन करावा लागला व खाजगी वाहतूकदारांची अरेरावी सहन करावी लागली.सामान्य माणसाची एकच मागणी आहे की, संप मिटावा व सुरळीत वाहतुक चालु व्हावी .

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात