📰 ताज्या घडामोडी

परतूर शहरात फुलले ब्रम्हाकमळ....हिमालयातील फुलाच्या राजा आहे देव पुष्प

च
Shamsundar chittoda
12 सप्टेंबर 2021•⏱️ ३ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर(प्रतीनीधी)

सन्मित्र कॉलनी तहसील कार्यालय मागे श्री चंद्रकांत गाडेकर यांच्या निवासस्थानी ८ वर्षांपुर्वी पुणे येथून २०१३ ला ब्रम्हकमळचे रोप आणुन लावले होते. ते आज रोजी ते उमलले.

हिमालय फुलांचे सम्राट/राजा म्हणून ओळखले जाणारे दुर्मिळ देवता फूल म्हणजे ब्रह्मकमल आता परतुर च्या सन्मित्र कॉलनीत फुलले आहे. सन्मित्र कॉलनीतील रहिवासी श्री चंद्रकांत गाडेकर यांच्या घरी या देवपुष्पाने / ब्रम्हाकमळने त्यांचे दर्शन दिले आहे. यापूर्वी हे दिव्य फूल आजुबाजूच्या परिसरात उमलले होते असे आढळून आले नाही. असे मानले जाते की ब्रम्हाकमळ हे देवी -देवतांचे फूल आहे, ज्यांच्यामध्ये स्वतःमध्ये अमर्याद अलौकिक शक्ती व औषधी गुणधर्म आहेत.हे फूल वर्षातून फक्त एकदाच मध्यरात्री फुलते आणि पहाटेच्या आधी बंद होते. जेव्हा हे फूल फुलते, तेव्हा त्याचा अलौकिक सुगंध देखील संपूर्ण वातावरणात पसरतो. या फुलाचे दर्शन स्वतःच नशीबाचे प्रतीक आहे आणि त्याच्या दर्शनाच्या वेळी केलेल्या इच्छा पूर्ण होतात असा समज आहे.

ब्रम्हाकमळ देव फूल फक्त हिमालयीन प्रदेशातील 12,000 फूट उंचीच्या डोंगरांवर आढळतो आणि म्हणून उत्तराखंड सरकारने त्याला आपले राज्य फूल म्हणून घोषित केले आहे. या फुलामध्ये अनेक औषधी घटक आढळतात. त्याचवेळी, परतुर शहरातील रहिवासी सि. एस. गाडेकर यांनी सांगितले की, ही वनस्पती आठ वर्षांपूर्वी पुणे येथून त्यांच्या सुन अश्विनी गाडेकर (मेहेत्रे) यांच्या माध्यमातून परतुर येथे पोहोचली होती.

डोंगरांमध्ये, विशेषत: हिमालयीन प्रदेशात वाढणाऱ्या ब्रह्मा कमलला विशिष्ट प्रकारच्या तापमानाची आवश्यकता असते. घरी वाढणे खरोखर दुर्मिळ आहे. हे लॅब, पॉली हाऊस आणि नियंत्रित वातावरणात अनेक ठिकाणी घेतले जाते. सामान्य तापमानात ते वाढणे दुर्मिळ आहे.

कोरोना काळात झालेल्या वातावरण बदलांमुळे हे ब्रम्हाकमळ उमलले अन्यथा हे अशक्य आहे परतुर सारख्या गरम वातावरणात हे फूल उमलणे. गणेश गाडेकर म्हणाले.

भारतात ब्रह्मकमळ (Night queen) शास्त्रीय नाव एपिफायलम ऑक्सिपेटॅलम . ब्रम्हाकमळ एखाद्या वनस्पतीचा किंवा वस्तूचा आधार घेऊन २-३ मी. उंच वाढते. मुळे खोलवर जातात. जुने झालेले खोड गोलसर व राखाडी-हिरवे असते. नवीन खोड चपटे, १–५ सेंमी. रुंद, हिरवे व पानासारखे दिसते. त्याच्या पेरावरील बेचक्यांतून नवीन फांद्या येतात. पाने छोट्या काट्यांमध्ये रूपांतरित झालेली असतात. पानासारख्या दिसणाऱ्या खोडावर पावसाळ्यात मोठी, पांढरी, सुगंधी व एकेकटी फुले येतात. ती मध्यरात्री उमलतात व सूर्योदयापूर्वी मावळतात. म्हणून त्या वनस्पतीला चंद्रकमळ असेही म्हणतात. फुलांच्या नळीचा व त्यांवरील काही बाह्यदलांचा म्हणजेच पाकळ्यांचा रंग लालसर तपकिरी असतो. आतील पाकळ्या नाजूक, लांबट व पांढऱ्या असतात. फुलांचा व्यास १५–२० सेंमी. असतो. पुंकेसर असंख्य असतात. कुक्षीवृंत हिरवट पांढरे किंवा पांढरे असते. फळ मोठे व मांसल असून त्याच्या गरामध्ये बिया असतात. खोडाच्या तुकड्यापासून तसेच बियांपासून पुनरुत्पादन होते. सुंदर व सुवासिक फुलांमुळे तिची लागवड शोभिवंत वनस्पती म्हणून बागेत करतात. फुलातील सुगंध बेंझील सॅलिसिलेट या कार्बनी संयुगामुळे असतो.

ब्रह्मकमल भारताच्या हिमाचल, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, काश्मीरमध्ये आढळते. या वस्तुस्थितीबद्दल तज्ञांनाही आश्चर्य वाटते, दैवी समजल्या जाणाऱ्या या फुलाच्या बहरण्यासाठी योग्य वेळ जुलै- सप्टेंबर आहे, ते सुद्धा कोणत्याही एका रात्री फुलते.

सौ. मंगल गाडेकर, सौ. ज्योती उबाळे व श्रीषा गाडेकर यांनी ब्रम्हाकमळ पुजन केले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→20 ऑगस्ट 2021
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याचे मुख्य सूत्रधार अजूनही मोकाटच फिरत आहेत,त्यांना कधी पकडणार-जिल्हा उपाध्यक्ष कल्याण बागल

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याचे मुख्य सूत्रधार अजूनही मोकाटच फिरत आहेत,त्यांना कधी पकडणार-जिल्हा उपाध्यक्ष कल्याण बागल

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात