📰 ताज्या घडामोडी

सरपंच परिषद व भाजपा नगरसेवकांचे आमदार लोनिकरांसह ,जिल्हाधिकारी,एस.पी नां निवेदन,साई बाबा मंदिरा समोरील चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक नाव द्या व मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीला परवानगी द्या,माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्याशी केली चर्चा, लोणीकर घेणार पुढाकार परिषदेला केले आश्वस्त

Shamsundar chittoda
16 जुलै 2021⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर शहरातील साई मंदिरासमोरील वाटूर परतुर परतूर सेलू रस्त्यावरील चौकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या व साईबाबा मंदिराच्या लगतच्या जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वरुढ पुतळा उभारण्यास परवानगी द्यावी अशा आशयाचे निवेदन सरपंच परिषद व व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक व तालुकाध्यक्ष यांनी आमदार बबनराव लोणीकर यांच्या सह, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले

या निवेदनामध्ये म्हटले आहे की परतूर शहरासह मंठा परतूर तालुक्यातील शिवभक्तांची छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा परतूर शहरामध्ये उभारण्यात यावा अशी गेल्या अनेक वर्षापासून ची मागणी असून वाटूर परतुर तसेच परतूर सेलू रस्त्यावर असणाऱ्या शहरातील चौका चे छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण करा त्याच बरोबर शहराच्या दर्शनी भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारून सौंदर्यीकरण करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे पुढे या निवेदनात म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा साईबाबा मंदिराच्या लगत च्या जागेत केल्यास हा शहराचा अतिशय महत्त्वपूर्ण भाग असून येथूनच शहरात ग्रामीण भागातील नागरिक प्रवेश करत असतात प्रवेशद्वारावरच छत्रपतींचा पुतळा उभारल्यास शिवभक्तांच्या भावनांचा आदर राखला जाईल व तमाम शिवप्रेमींना आत्मिक समाधान मिळेल त्यामुळे या परिसरामध्ये पुतळा उभारण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे

ऐतिहासिक असलेल्या परतुर शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणे गरजेचे असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे शिवभक्तांची इच्छा पूर्ण होण्याबरोबरच शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे त्यामुळे हा पुतळा उभारण्यास परवानगी द्यावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर शिवछत्रपतींच्या पुतळा उभारणीसाठी पर्याय म्हणून शासकीय विश्रामग्रह समोरील जागा ही उपयुक्त असून शहरात साकारत असलेल्या नाट्यग्रह परिसरात पाच एकर जागा उपलब्ध आहे हा एक पर्याय होऊ शकतो परंतु सर्व शिवभक्तांचे साईबाबा मंदिर परिसराला प्राधान्य असून या परिसरात पुतळा उभारण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे

=======================

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणी संदर्भात आमदार लोणीकरांशी चर्चा*

=======================

छत्रपती शिवाजी महाराजांचा साईबाबा मंदिर परिसरात पुतळा उभारण्यास संदर्भामध्ये माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांची भेट घेऊन या शिष्टमंडळाने निवेदन सादर करण्याबरोबरच सुमारे एक तास चर्चा केली या चर्चेदरम्यान माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी परतुर शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आवश्यकता असून साईबाबा मंदिरासमोरील सावकास छत्रपती शिवाजी चौक असे नामकरण करून साई मंदिराच्या बाजूला पुतळा उभारण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे सांगतानाच या कामामध्ये आपण स्वतः पुढाकार घेणार असल्याचे ते म्हणाले पुढे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या माध्यमातून मतदार संघातील सर्व शिवभक्तांना आत्मिक समाधान लाभेल यासह शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडेल असे सांगतानाच या कामासाठी शासकीय स्तरावरील सर्व नियम सर्वोच्च न्यायालयाने पुतळ्या संदर्भामध्ये आखून दिलेल्या चौकटीत सर्व परवानग्या मिळवून देण्यासाठी आपण पुढाकार घेणार असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीच्या माध्यमातून पुतळा बसवण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे ते म्हणाले

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पावित्र्य जपण्यासाठी साईबाबा मंदिराच्या लगत ची जागा सर्वोत्तम*

=======================

परतूर शहरात येणाऱ्या वाटुर परतूर व सेलू परतूर रस्त्याच्या अगदी दर्शनी भागामध्ये साई मंदिराच्या लगतच्या जागेत पुतळा उभारणी केल्यास छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पावित्र्य राखले जाईल याकडेही यावेळी आलेल्या शिष्टमंडळाचे लक्ष माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी वेधले

यावेळी सरपंच परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ, सरपंच परिषदेचे जालना जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न कणसे ,भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष रमेश भापकर नगरसेवक प्रकाश चव्हाण, प्रवीण सातोनकर, कृष्णा अरगडे अडव्होकॅट

जगन बागल सरपंच परिषदेचे परतुर तालुका अध्यक्ष प्रफुल शिंदे सरपंच परिषदेचे मंठा तालुका अध्यक्ष माऊली गोडगे यांचा शिष्टमंडळात समावेश होता

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात