📰 ताज्या घडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचेअंतर्गत मूल्यमापन 10 जून पासूनतर निकाल जुलै महिन्यात लागण्याची शक्यता

च
Shamsundar chittoda
10 जून 2021•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

दहावीच्या विद्यार्थ्यांची अंतर्गत मूल्यमापन करण्याची प्रक्रिया 10 जूनपासून सुरू होणार आहे. शिक्षक व मुख्याध्यापकांना मूल्यमापन कार्यपद्धतीचे यू टय़ुबच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. मूल्यमापन कार्यपद्धतीचे स्वतंत्र वेळापत्रक मंडळाने जाहीर केले असून या वेळापत्रकानुसार दहावीच्या मूल्यमापनाचा कार्यक्रम 10 जून ते 3 जुलैपर्यंत चालणार असून त्यानंतर जुलैमध्ये निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या मूल्यमापन कार्यपद्धतीत शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यावरील जबाबदाऱया निश्चित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक शाळेत 7 सदस्यांची निकाल समिती स्थापन केली जाणार असून ही समिती मंडळाच्या कार्यवाहीच्या वेळापत्रकानुसार कामकाजाची रूपरेषा ठरवणार आहे.

तसेच निकालाचे परीक्षण व नियमन समितीमार्फत केले जाणार आहे. या कार्यवाहीत मुख्याध्यापकांवर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे

शाळा समितीकडून तयार करण्यात आलेला निकाल संगणकप्रणालीमध्ये नोंदवण्याची आणि मंडळाला निकाल गोपनीय पद्धतीने देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असणार आहे.

नियमित विद्यार्थ्यांचा नववीचा निकाल आणि दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन तसेच तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन इत्यादीच्या आधारे विषयनिहाय गुणदान केले जाईल.

खासगी आणि पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पाचवी ते नववीच्या वर्गात प्राप्त झालेल्या गुणांचा आधार घेतला जाणार आहे.

मंडळाला चुकीचा निकाल सादर केल्यास शाळांना जबाबदार धरण्यात येणार आहे.

प्रशिक्षणानंतर शिक्षकांना विषयनिहाय गुणतक्ते वर्ग शिक्षकांकडे सादर करण्यासाठी 11 ते 20 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

तयार केलेला निकाल समितीकडे सादर केला जाणार आहे. सर्व प्रप्रिया 30 जूनपर्यंत चालणार असून विभागीय व राज्य मंडळ स्तरावरची निकाल तयार करण्याची प्रक्रिया 3 जुलैपासून केली जाईल.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→10 जून 2021
राष्ट्रवादि कॉग्रेस जिल्ह्यातून मराठा आरक्षण करीता पंतप्रधान मोदी यांना पाठवणार पाच लाख पत्र -- युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात

राष्ट्रवादि कॉग्रेस जिल्ह्यातून मराठा आरक्षण करीता पंतप्रधान मोदी यांना पाठवणार पाच लाख पत्र -- युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात