📰 ताज्या घडामोडी

शिवराज जी नारियलवाले जालना यांच्या बाबत मुख्यमंत्री,गृहमंत्री यांना तहसील परतुर च्या मार्फत भाजपा युवा मोर्चा परतूर च्या वतीने बबनराव लोणीकर साहेब व राहुल भैया लोणीकर यांच्या सुचणे वरून निवेदन देण्यात आले

Shamsundar chittoda
28 मे 2021⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर (प्रतीनीधी)

पोलिसां कडून सूडबुद्धीने अमानुषपणे करण्यात आलेल्या लाठीचार्ज चा तीव्र शब्दांमध्ये भाजपा युवा मोर्चा परतुर च्या वतीने जाहीर निषेध करत,दोषी पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी,नसता युवा मोर्चा तीव्र आंदोलन करेल,आसा आशयाचे निवेदन परतूर येथे तहसीलदार रूपा चित्राक यांना देण्यात आले निवेदना पूढे सांगण्यात आले कि

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून आजपर्यंत महिला तरुण संत महंत यांच्यासह अनेकांना हा माणूस मारहाण झाल्याचं स्पष्ट झाला आहे हे सरकार महाराष्ट्राचा सरकार आहे की रजाकारी प्रवृत्तीच सरकार आहे हाच खरा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे या महाराष्ट्रात मागील दोन वर्षात पोलिसांना देखील मारहाण झाली परंतु त्यावेळी काही विशिष्ट लोकांचा समुदाय समोर होता म्हणून की काय पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली नाही परंतु भाजपा युवा मोर्चा चा पदाधिकारी याने एखाद्या चुकीच्या बाबी विरोधात आवाज उठवला म्हणून पोलिसांनी भाजपा युवा मोर्चाचे जालना जिल्हा सरचिटणीस शिवराज पहिलवान नारियलवाले या युवकाला अमानुष मारहाण केली आहे या माणूस मारहाणीचा भाजपा युवा मोर्चा म्हणून आम्ही निषेध करतो आहोत. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महानिरीक्षक तसेच पोलीस अधीक्षक यांनी या युवकाला मारहाण करणाऱ्या सर्व पोलिसांना तात्काळ निलंबित करावे.

भाजपा युवा मोर्चाचे जालना जिल्हा सरचिटणीस शिवराज पैलवान नारियल वाले आपल्या बहिणीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले असता ना तेथे उपस्थित असणारे पोलीस दर्शन देवावाले या युवकाचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे एकत्र आलेल्या नातेवाईक व गवळी समाजाच्या तरुणांना शिवीगाळ करत होते या अन्यायाला वाचा फोडावी या उद्देशाने नारियल वाले यांनी त्यांचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला त्याचा राग मनात धरून उपस्थित सर्व पोलिसांनी मिळून संबंधित युवकाला अमानुष मारहाण केली आहे या माणूस मारहाणीचा सर्व स्तरातून जाहीर निषेध होत आहे.

भाजपा युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी कोरोना काळात सर्वसामान्य लोकांना मदतीचा खूप मोठा ओघ सुरु ठेवला होता शिवराज नारियलवाले यांनी पुढाकार घेऊन १०० पेक्षा अधिक युवकांचे रक्तदान शिबिर आयोजित केले होते सामाजिक बांधिलकी जपणारे युवा मोर्चा पदाधिकारी हे कायम संयमी आणि समाजहिताची कामे हाती घेतात परंतु अशा युवकांच्या विरोधात अगदी क्षुल्लक कारणावरून एवढी अमानुष मारहाण होत असेल तर ही प्रशासनासाठी अत्यंत गंभीर बाब आहे या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांवर मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महानिरीक्षक, जालना पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ कार्यवाही न केल्यास भाजपा व युवा मोर्चा आक्रमक पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाही असे झाल्यास त्यासाठी सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील.

यावेळी सोबत उपस्थित शत्रूघन कणसे ता..अध्यक्ष युवा मोर्चा परतुर नगरसेवक कृष्णाजी आरगडे, शहराध्यक्ष राजेंद्रजी मुंदडा सरपंच माऊली सोळंके सरपंच केशव ढवळे, शेख नदीम,विष्णू उगले, युवा मोर्चा उपाध्यक्ष शिवाजी भेंडाळकर, संतोष हिवाळे शुभम सोळंके,शुभम कठोरे शिवसंग्राम सचिन खरात रोहित मुंदडा, गणेश बोंनगे, राजेश बोंनगे नामदेव कोरडे आदी भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते 🙏🙏

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात