📰 ताज्या घडामोडी

आंबेडकर नगरात घराघरात साजरी झाली तथागत गौतम बुद्ध जयंती !

च
Shamsundar chittoda
26 मे 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

lपरतूर,दि.26 (प्रतिनिधी) -विश्वशांतीदुत तथागत गौतम बुद्ध यांची २५८३ वी जयंती बुधवारी (दि.(२६ ) शहरात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता घराघरात मनोभावे व शांततेने बुद्धवंदना घेऊन विश्वशांतीदुताला अभिवादन करण्यात आले.

शहरातील डॉ. आंबेडकरनगरात कोरोना नियमांचे पालन करत घरातच जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी आपल्या कुटुंबासमवेत तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक वंदना घेतली. दीपप्रज्वलन करून अभिवादन केले. यावेळी पाडेवार म्हणाले की,सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे.राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव व कोरोनामुळे मृत्युमुखी पडणारांची संख्या पाहता शासनाने काही नियम घालून दिले आहेत.अनुयायांनी शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.शासनाच्या निर्देशांचे पालन करत तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त सर्व आंबेडकरी अनुयायांनी रस्त्यावर गर्दी न करता आपआपल्या गावातील बौद्ध विहारात मोजक्याच उपासकाच्या उपस्थिती मध्ये दीपप्रज्वलन करून बौद्ध वंदना घेऊन तथागत गौतम बुद्ध यांची जयंती सर्व बौद्ध बांधवानी आपल्या कुटुंबासमवेत घरातच साजरी केली, जगावरील कोरानाचे संकट लवकर दुर होवो अशी प्रार्थना यावेळी बौद्ध अनुयायी यांनी केली, यावेळी अर्जुन पाडेवार, संजना पाडेवार आर्या पाडेवार, करण पाडेवार, अजय पाडेवार, यांची उपस्थिती होती,

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→24 मे 2021
परतूर येथे वीज कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती ती लावून काम बंद आंदोलन

परतूर येथे वीज कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती ती लावून काम बंद आंदोलन

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात