📰 ताज्या घडामोडी

सोनदेव येथे 258 नागरिकांनी घेतली कोरोनाची*लस.,ज्ञानेश्वर शेजुळ यांनी केला मोहीमेचा शुभारंभ,.नागरिकांनी मानले पंतप्रधान मोदीव आमदार लोणीकर यांचे आभार

Shamsundar chittoda
10 एप्रिल 2021⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

जालना

{प्रतिनिधी} गेल्या वर्षभरापासुन कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असल्याने जनता भयभीत झालेली आहे.अनेक महीण्यापासुन सर्वसामान्य शेतकरी ,शेतमजुर,छोटेमोठे व्यापारी लाॅकडाऊन असल्यामुळे सर्वच क्षेत्रातील जनता भयभीत व परेशान आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक प्रकारची मदत केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावर उपाय म्हणुन संपुर्ण देशातील नागरिकांसाठी मोफत लस उपलब्ध करुन दिली आहे.

महाराष्ट्र राज्याचे मा.मंत्री तथा परतुर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री बबनराव लोणीकर यांच्या पुढाकाराने आज दि.10/04/2021 रोजी सेवली प्रा.आ.केंद्राअंतर्गत मौजे सोनदेव येथे 45 वर्षावरील नागरिकांसाठी मोफत लसिकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या लसिकरणाच्या कार्यक्रमाचा भा.ज.पा.चे जालना जिल्हाउपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर {माऊली} शेजुळ यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला.या कार्यक्रमात जवळपास 258 नागरिकांनी लसिकरणाचा लाभ घेतला आहे.सोनदेव येथे पहीले लसिकरण श्रीमती कुशीवर्ताबाई रावसाहेब खांडेभराड यांचे करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस उपलब्ध करुन दिल्याबद्दल व आमदार लोणीकरांनी लसिकरणासाठी पुढाकार घेतल्याने नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व आमदार बबनराव लोणीकर यांचे आभार मानले आहेत.

मौजे सोनदेव येथील नागरिक पुरुष व महीलांनी लसिकरणासाठी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतल्याने आज पर्यंत जालना तालुक्यातील हे सर्वाधिक लोकांनी लस घेतल्याची नोंद झाली आहे.

हा लसिकरणाचा कार्यक्रम चालु असतांना मा.मंत्री तथा आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी सेवली प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.दिनेश कुलकर्णी यांच्याकडुन चालु असलेल्या लसिकरणाचा भ्रमणध्वनीद्वारे आढावा घेतला.व नागरिकांनी मोठ्याप्रमाणात दिलेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भा.ज.पा.चे जालना जिल्हाउपाध्यक्ष,ज्ञानेश्वर {माऊली} शेजुळ,प्रा.आ.केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डाॅ.दिनेश कुलकर्णी,सामाजिक कार्यकर्ते श्री ज्ञानदेव सखाराम ढाकणे,श्री मदन सोळुंके,श्री भगवान माघाडे,आरोग्य कर्मचारी मंगेश बारवकर,श्रीमती

जोसेफ मॅडम,श्रीमती गुंजाळे मँडम,श्रीमती पडघान मॅडम,श्री हगवणे,श्री तारु,श्री खाडे, श्री राम हेगडकर {सर} श्रीमती मराठे मॅडम,श्री गजानन शेजुळ,अंगणवाडी कार्यकर्ती,आशा वर्कर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात