📰 ताज्या घडामोडी

अचानकपणे लॉकडाऊन सादृष्य निर्बध लादल्याने सर्वसामान्य कष्टकरी,छोटे व्यापारी अडचणीत,सर्वसामान्य जनतेचा उद्रेक होण्याची शक्यता,सर्वसामान्य जनतेची व्यवस्था करा,मगच कडक निर्बंध लादा -माजी मंत्री बबनराव लोणीकर

Shamsundar chittoda
7 एप्रिल 2021⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर(प्रतिनधी) सरकारने हप्त्यात शनिवार रविवार असे दोन दिवस लॉक डाउन करण्याची घोषणा केली होती मात्र राज्यात इतर दिवशी लॉक डाउन सादृश्य कडक निर्बंध लादल्याने सर्वसामान्य जनता त्याचबरोबर हातावर पोट असलेले छोटे व्यवसायिक यांचा उद्रेक होण्याची शक्यता असून माननीय मुख्यमंत्री यांनी व सरकारने सर्वसामान्यांच्या गरजांची पूर्तता करून मग खडक निर्बंध लावावे असे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात ही मागणी केली असून पुढे या पत्रात म्हटले आहे की मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून सहकार्य करण्याचे आवाहन केले होते या अनुषंगाने राज्यामध्ये शुक्रवारी रात्रीपासून ते सोमवारी सकाळपर्यंत आता प्रत्येक हप्त्याच्या शेवटी लॉकडाउन डाऊन करण्यात येणार होता मात्र सरकारने कडक निर्बंधांचा नावाखाली लॉक डाऊन सदस्य निर्बंध घातल्याने हातावर पोट असणाऱ्या ची पंचायत झाली असून छोटे व्यापारी मजूर कष्टकरी यांना उपजीविका चालवण्यासाठी पॅकेज उपलब्ध करून द्यावे व नंतरच लॉक डाउन लावावा असे पत्रात नमूद करण्यात आले आहे पुढे या पत्रात म्हटले आहे की, हे निर्बंध लादताना सर्व घटकांचा विचार घेणे आवश्यक होते मात्र असे न करता अचानक पणे सदृश्य परिस्थिती निर्माण करून सरकारने सर्वसामान्यांच्या पोटावर मारू नये असे पत्रात नमूद करण्यात आले असून सर्वसामान्यांचा विचार करूनच निर्बंध लावावे असेही म्हटले आहे कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावत असून या संकटाच्या काळात सरकारने शेतकरी कष्टकरी हातावर पोट भरणारे छोटे व्यवसायिक यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करून मगच अशा प्रकारची भूमिका घ्यावी असेही पत्रात म्हटले आहे या संसर्गाच्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी सरकारने उपाय योजना कराव्यात असे शेवटी नमूद करण्यात आले आहे

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात