मंठा (प्रतीनीधी)येथील तळणी रोडवरील महावीर जीनींगकडुन शेतकर्यांची फसवणुक व अर्थीक लुट होत आसल्याचा आरोप *महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी केला आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मंठा तहसिलदार यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महावीर जीनींगमध्ये शेतकरी राजा सोबत फसवणुकीचे काम सुरू आसुन शासनाच्या हमी भावापेक्षा खुप कमी भावाने या जीनींग चालकांकडुन शेतकर्यांचा कापुस खरेदी केला जात आहे. म्हणुन शेतकर्यांवर अन्याय होत आसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या वर्षी अतिवृष्टी ने कापुस पिक कमी आले होते. कारण या वर्षीच्या पावसाने शेतकर्यांच्या पिकांची खुप मोठी नासाडी झाली होती. राज्य व केंद्र सरकारने शेतकर्यांना योग्य प्रकारे अर्थीक मदत केली नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी केला आहे. या कारणामुळे शेतकरी अर्थीक आडचणीत आहे. यातच जिनींग,आडत हे शेतकर्यांची फसवणुक करुन लुटतांना दिसत आहे. शेतकर्यांनी नेमकं जगायचं कसं आसा सवाल मनसेचे काकडे यांनी ऊपस्थीत केला आहे. मंठा येथील महावीर जीनींगमध्ये शेतकर्यां सोबत गैर वर्तणुक केली जाते. व शेतकरी राजाची हेळसांड व अर्थीक लुट केली जात आहे. या जीनींग चालकाने खुप कमी भावाने शेतकर्यांचा कापुस खरेदी केला आहे. म्हणुन या महावीर जीनींगवर तातडीने कार्यवाही करावी नसता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आंदोलनाची भुमीका घेतली जाईल आसा ईशारा सिध्देश्वर काकडे यांनी दिला आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे मंठा तालुका अध्यक्ष मारोती लोमटे ऊपस्थीत होते.
मंठा येथील महावीर जीनींगवर कार्यवाही करण्याची मनसे विद्यार्थी सेनेची मागणी
आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा
सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.
इतर ताज्या बातम्या
सर्व बातम्या पहा ↗परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा