📰 ताज्या घडामोडी

माणसाने जीवन जगण्यात समतोल साधला पाहिजे ----सरपंच उद्धव पवार

च
Shamsundar chittoda
2 जानेवारी 2021•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

तळणी/ प्रतिनिधी : मानवाला जीवनामध्ये तीन अवस्थांमधून जावे लागते, बाल्यअवस्था,तरुणपण आणि वार्धक्य या तीनही अवस्थांमधून जाताना आपण जे कर्म करतो त्याचे फळ निश्चितच मिळते असे प्रतिपादन तळणी येथील सरपंच उद्धव पवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, विभागीय कार्याध्यक्ष पंडितराव बोराडे, मंठा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अनिल बा. खंदारे यांच्या वाढदिवसानिमित्त तळणी येथे आयोजित कार्यक्रमात श्री पवार बोलत होते. वाढदिवसानिमित्त नेमिनाथ महाराज संस्थान मधील वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले तसेच मंठा येथेही ह भ प ज्ञानेश्वर महाराज मदने माऊली यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांनाही मिष्ठान्न वाटप करण्यात आले. तळणी येथे झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सरपंच उद्धव पवार यांनी सांगितले की, माणसाने गर्व अहंकार लोभ इर्षा आदिचा त्याग करून आनंदी जीवन जगावे. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पत्रकार समाजाचे प्रश्न सोडवतो असे सांगून त्यांनी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे विभागीय कार्याध्यक्ष पंडितराव बोराडे आणि मंठा कार्याध्यक्ष अनिल बा. खंदारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि सामाजिक कार्यक्रम राबविल्याबद्दल आयोजकांचे कौतुकही केले. तळणी व मंठा येथे झालेल्या कार्यक्रमाला ह भ प ज्ञानेश्वर महाराज, ह भ प निवृत्ती महाराज कांगणे, ह भ प अर्जुन महाराज बादाड, ज्येष्ठ पत्रकार बाबा काका कुलकर्णी, पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष दायमा, जिल्हा कार्यकारणी सदस्य रवी पाटील, तालुका अध्यक्ष बालाजी कुलकर्णी, पत्रकार संघाच्या महिला तालुका अध्यक्ष सौ मंजुषा काळे, माजी कार्याध्यक्ष तथा पत्रकार संघाचे सल्लागार अरुण राठोड, वसंतराव राऊत, गौतम सदावर्ते, डॉ आशिष तिवारी, आसाराम शेळके, केशव येऊल, प्रकाश भावसार, प्रवीण सरकटे, नागेश भरदम यांची उपस्थिती होती

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→2 जानेवारी 2021
कलशाव रोहण : ऊस्वद येथील व्यकेश्वर महादेव मदीराचा कलशावरोहण सपन्न

कलशाव रोहण : ऊस्वद येथील व्यकेश्वर महादेव मदीराचा कलशावरोहण सपन्न

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात