📰 ताज्या घडामोडी

राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत दर्शन शिंदे राज्यातून दुसरा

च
Shamsundar chittoda
17 डिसेंबर 2020•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

बीड येथील प्रभास 24 न्यूज कडून १ ते ३० नोव्हेंबर २०२० या काळात राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ४ ऑक्टोबर हा माजी खासदार केशरकाकु क्षीरसागर यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने बीड जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात उलेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा आणि महापुरुषांच्या विचारांची आवड विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी या उद्देशाने ही वत्कृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक स्पर्धकांनी आपापल्या वक्तृत्वाचे व्हिडीओ पाठवून सहभाग नोंदविला होता. सदरील स्पर्धेचा निकाल १५ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये *शालेय गटातून दर्शन एकनाथ शिंदे याचा दुसरा क्रमांक आला*. संस्कार प्रबोधिनी विद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या दर्शन शिंदे याने *‘छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य’* या विषयावर स्पर्धेत मत प्रतिपादन केले होते. त्याच्या *व्हिडिओला एकूण ५४३ लाईक्स, ३०० कॉमेंट्स, आणि १५०० विवर्स मिळाले होते.* विजयी स्पर्धकांना महापुरुषाचे चरित्र ग्रंथ, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह पोस्टाने पाठवून गौरविणार असल्याचे संयोजकांनी पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे.

दर्शनला स्पर्धेसाठी त्याच्या शाळेतील शिक्षकवृंद, पालक आदींचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल त्याच्या शाळेचे संस्थाध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, महानुभाव संप्रदायाचे सुदामराज शास्त्री, नातेवाईक, मित्र परिवारांनी अभिनंदन केले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→15 डिसेंबर 2020
अयोध्येतील भव्य राममंदिर लोकवर्गणीतून उभे राहणार - सावता काळे

अयोध्येतील भव्य राममंदिर लोकवर्गणीतून उभे राहणार - सावता काळे

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात