📰 ताज्या घडामोडी

धर्माबाद ते मनमाड (मराठवाडा) एक्स्प्रेस गुरूवारीपासून धावणार...

च
Shamsundar chittoda
22 डिसेंबर 2020•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

परभणी, दि. 22 (प्रतिनिधी) ः दक्षिण मध्य रेल्वेने बंद केलेली धर्माबाद - मनमाड - धर्माबाद (मराठवाडा एक्स्प्रेस) ही विशेष एक्स्प्रेस रेल्वे गुरुवारपासून (दि. 24) पुन्हा धावणार आहे.

दरम्यान, ऐनदिवाळीतच बंद केलेली मराठवाडा एक्स्प्रेस ही रेल्वे प्रवाशांसह संघटनांच्या जोरदार मागणीनंतर दक्षिण मध्य रेल्वेस सुरू करावी लागली.

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वे विभागाने नांदे़ड ते पनवेल या एक्स्प्रेस पाठोपाठ मराठवाड्यातील रेल्वेप्रवाशांच्या सोयीकरिता धर्माबाद ते मनमाड व मनमाड ते धर्माबाद ही विशेष रेल्वे दिवाळीपुर्वी सुरू केली होती. मात्र, ऐन दिवाळीतच ती काही न सांगता प्रतिसाद नसल्याचे कारण देत अचानक बंद केली होती. मात्र, सर्वांच्याच पाठपुराव्यामुळे रेल्वे प्रशासनास ती पुन्हा सुरू करावी लागली.

ही रेल्वे धर्माबादहून सकाळी चार वाजता निघणार आहे. नांदेड स्थानकावर पाच वाजून 28 मिनिटांनी, पूर्णेत सहा वाजून तीन मिनिटांनी, परभणीत सहा वाजून 38 मिनिटे, मानवतरोड सहा वाजून 57 मिनिटे, सेलूत सात वाजून 17 मिनिटे, परतूर सात वाजून 44 मिनिटे, रांजनी सात वाजून 54 मिनिटे, जालना आठ वाजून 48 मिनिटे, बदनापूर नऊ वाजून 09 मिनिटे, मुकूंदवाडी 9 वाजून 45 मिनिटे, औरंगाबाद येथे नऊ वाजून 55 मिनिटांनी, लासूर येथे दहा वाजून 30 मिनिटे, रोटेगाव 11 वाजून 30 मिनिटे, नगरसोल 12 वाजून 20 मिनिटे, अंकई 12 वाजून 49 मिनिटे व मनमाड रेल्वे स्थानकावर एक वाजून 20 मिनिटांनी पोचेल.

मनमाड येथून दुपारी तीन वाजता परतीच्या प्रवासास निघेल. अंकई येथे दुपारी तीन वाजून 18 मिनिटे, नगरसोल दुपारी तीन वाजून 40 मिनिटे, रोटेगाव तीन वाजून 49 मिनिटे, लासूर चारवाजून 19 मिनिटे, औरंगाबाद येथे पाच वाजून 50 मिनिटांनी, मुकूंदवाडी सहावाजून 11 मिनिटे, बदनापूर सहा वाजून 36 मिनिटे, जालना सहा वाजून 50 मिनिटे, रांजनी सात वाजून 14 मिनिटे, परतूर सात वाजून 29 मिनिटे, सेलू सात वाजून 51 मिनिटे, मानवतरोड आठ वाजून चार मिनिटे, परभणी आठ वाजून 43 मिनिटे, पूर्णा येथे नऊ वाजून 33 मिनिटांनी, नांदेड येथे दहा वाजून आठ मिनिटे, उमरी 11 वाजून 10 मिनिटे व धर्माबाद येथे रात्री 12 वाजून दहा मिनिटांनी ही एक्प्रेस पोचेल.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→22 डिसेंबर 2020
महावीतरणचा प्रताप अधिकृत विज जोडणी नसताना सुध्दा आले बिल

महावीतरणचा प्रताप अधिकृत विज जोडणी नसताना सुध्दा आले बिल

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात