📰 ताज्या घडामोडी

विद्यार्थी, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार - आ. सतीश चव्हाण

Shamsundar chittoda
6 नोव्हेंबर 2020⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वात अंबड येथे सहविचार सभा पार पडली. यावेळी आमदार सतीश चव्हाण यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. तसंच महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याला नोकरी कशी मिळेल, यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले. त्याचबरोबर आपण ग्रामीण भागातील शाळांसाठी 6 हजार कॉम्पुटर आणि वाचनालयातील पुस्तकांसाठी 4 कोटी रुपये दिल्याची माहिती दिली.. यावेळी सभेला उपस्थित पदाधीकार्यांनी सतीश चव्हाण यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प व्यक्त केला... दरम्यान या कार्यक्रमात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील ऑडिओ कॉल द्वारे सभेला संबोधित केलं. महाविकासघाडीची स्थापना झाल्यानंतर ही महत्त्वाची निवडणूक असून सतीश चव्हाण यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन उपस्थित पदवीधर मतदारांना केलं... यावेळी राष्ट्र्रवादी कॉग्रेस पार्टी,जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख,जि.प.कृषी सभापती मा.विष्णुपंत गायकवाड,माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस आय मा.भिमराव डोंगरे,प्रभाकर पवार,शिवसेना उपजिल्हा प्रमुख हनुमान धांडे,मा.डॉ.नारायणराव बोराडे,शिवसेना तालुकाध्यक्ष मा.अशोकराव बरडे,कृ.उ.बा.स.सभापती मा.सतिष होंडे,ख.वि.सं.चेअरमन मा.भाऊसाहेब कनके,व्हाईस चेअरमन श्रीरामभाऊ जाधव, उपनगराध्यक्ष न.प.,अंबड मा.केदार कुलकर्णी,कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकरी साखर कारखाना,संचालक मा.कैलास जिगे,राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष मा.ॲड संजय काळबांडे,राष्ट्रवादी कॉग्रेस डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष मा.योगेश ढेंबरे,राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्ष मा.ॲड अफरोज पठाण,राष्ट्रवादी युवक कॉग्रेस,शहराध्यक्ष मा.अर्जुन भोजने,शिवसेना शहर प्रमुख मा.कुमार रुपवते,पं.स.सदस्य मा.प्रभाकर रणदिवे,मा.चंद्रमणी खरात,शिवाजी कटारे,रजियोद्यीन पटेल,प्रकाश नारायणकर, पंडीतराव कडूळे,सुधाकर हुलमुख,राजण उढाण,अनिल पाष्टे,हाजी फेरोज, कैसरभाई,पाशा पठाण,भगवान शिंदे,रविंद्र डोंगरे,गालेद चाऊस,कैलास भोरे,राहुल खरात,नगरसेवक जाकेर डावरगावकर, काकासाहेब कटारे,शिवप्रसाद चांगले, डॉ.अविनाश वडगावकर, भैय्यासाहेब हातोटे,समदभाई बागवान,ॲड गायके,तकी सिद्यीकी,प्रभाकर डोखळे, प्राचार्य.राजेंद्र गायकवाड,प्राचार्य डॉ.शिवशंकर घुमरे, प्रा.शिवाजीराव मदन,गौतम ढवळे,अनिल गिरे,संदीप राठोड,राजू राठोड,सलीम बागवान,हाजी मनियार,गणेश गडगुळ आदी उपस्थित होते.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात