📰 ताज्या घडामोडी

शासनाच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांसाठी यावर्षी "काळी दिवाळी", माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची टीका,13 नोव्हेंबरला भाजपा पिठलं भाकरी देऊन करणार आंदोलन

Shamsundar chittoda
11 नोव्हेंबर 2020⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

केवळ सत्तेच्या हव्यासापोटी कुरघोडी करून सत्तेवर आलेल्या या महाविकास आघाडी सरकारकडे शेतकऱ्यांसाठी कोणताही ठोस अजेंडा नसून सरकारने अतिवृष्टी, पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. कोणत्याही शेतकऱ्यांपर्यंत शासनाची मदत पोहचली नाही. मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांची नावे या मदतीमध्ये आलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी संवाद कार्यक्रमात फराळ करा, रोषणाई करा असे वारंवार म्हटले परंतु आज शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच आहे. ना गोड धोड, ना रोषणाई म्हणून शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी ‘काळी दिवाळी’ आहे अशी टीका माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे

भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांसह तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना दिवाळीच्या पर्वावर आंदोलन करत निवेदन देऊन काळी दिवाळी साजरी करतील. भाजपा भाजपा युवा मोर्चा व भाजपा किसान मोर्चा तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयावर 13 नोव्हेंबरला शेतकरी तहसीलदार उपविभागीय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना पिठलं भाकर देऊन धरणे आंदोलन करतील. या आंदोलनाद्वारे सरकारकडे खालील मागण्या केल्या जातील -

१) महाराष्ट्रमध्ये अतिवृष्टी, सततच्या पाऊस व पुरामुळे झालेल्या शेती व पिकाचे फळबाग झालेल्या नुकसानभरपाई सरसकट दिवाळीपूर्वी कोरडवाहुला 25 हजार व बागायतीला हेक्टरी 50 हजार रुपये प्रमाणे देण्यात यावी. तुटपुंज्या मदतीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नये, कापसाची बोंडअळी बोंडसळी, सोयाबीन, धान्याचे झालेले नुकसान, फळपिकांचे झालेलं नुकसान याकरिता शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी.

२) केंद्राच्या MSP कायद्यान्वये 18 प्रकारच्या भरड धान्याची, कापसाची खरेदी केंद्र मुबलक प्रमाणात सुरु करावीत व दिवाळीतही खरेदी सुरु ठेवावी.

३) यावर्षी शेतकऱ्यांना कर्ज फेडणे अश्यक्य आहे म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी सरसकट करण्यात यावी.

४) हवामानवर आधारित फळ पीक विमा योजनेचे महाराष्ट्र सरकारने बदललेले निकष अन्यायकारक असून फक्त विमा कंपन्याच्या फायद्याचे आहेत. ते शेतकरी हिताचे विम्याचे बदललेले निकष त्वरित रद्द करून जुने 2018-19 चे निकष कायम करण्यात यावे.

५) किसान क्रेडीट कार्डची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी.

६) सध्या कृषी पंपाचे वितरण मार्च 2018 नंतर संपूर्णत: बंद आहे. ट्रान्सफार्मर जळला तरी नादुरुस्त ट्रान्सफार्मर 24 तासात देऊन दिवसा किमान वीजपुरवठा द्या.

७) रासायनिक खते, बियाणांचा रास्त दरात सुरळीत पुरवठा करा.

८) कृषी यांत्रिकीकरण, सुष्म सिंचन, नानाजी देशमुख कृषी समृद्धी अभियान तातडीने सुरू करण्यात यावे.

या सर्व मागण्यांकरिता भारतीय जनता पार्टी च्या वतीने 13 नोव्हेंबरला विरोधीपक्षनेते देवेंद्रजी फडणवीस व भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या निर्देशानुसार आंदोलन करणार आहे. तरी ह्या आंदोलनात सर्व शेतकरी व कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील लोणीकर यांनी केले आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात