📰 ताज्या घडामोडी

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची साधेपणाने दिवाळी साजरी,अनाथाश्रमातील मुलांना कपडे व फराळ वाटप करून केली दिवाळी

Shamsundar chittoda
15 नोव्हेंबर 2020⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

*

जालना(प्रतिनिधी) येथील स्वर्गीय शंकरलाल मुंदडा अनाथालया मध्ये अनाथ मुलांना कपडे व फराळाचे वाटप करून माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी आपली दिवाळी अतिशय साधेपणाने साजरी केली

यावेळी संस्थेचे वीरेंद्रजी धोका, दत्ता नाना आर्दड, अनाथ आश्रमाचे अधीक्षक राठोड ,नारायण पवार, सुनील राठी आदींची उपस्थिती होती

गेल्या पाच वर्षापासून

माजी मंत्री बबनराव लोणीकर परतुर येथील आपल्या निवासस्थानी व जालना येथे मातोश्री लॉन्स वर दीपावली पाडव्याला स्न्हेह मिलन कार्यक्रम आयोजित करत असतात परंतु यावर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर परतूर व जालना येथे दीपावली स्नेह संमेलनाचे आयोजन करता येणार नाही त्यामुळे प्रत्येक वर्षी दोन स्नेहमिलन सोबतच माजी मंत्री बबनराव लोणीकर वीरेंद्र जी धोका यांच्या अनाथ आश्रम मध्ये जाऊन दीपावली साजरी करत असतात मात्र या वर्षी स्न्हेह मिलन कार्यक्रम होणार नसला तरी माजी मंत्री लोणीकर यांनी स्वर्गीय शंकरलाल मुंदडा अनाथ आश्रम येथे जाऊन अनाथ मुलांसोबत दिवाळीचा आनंद घेत कपडे व फराळाचे वाटप करत अतिशय साधेपणाने दीपावली साजरी केली

यावर्षी दिवाळी सणावर असलेले कोरोनाचे सावट लक्षात घेता माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिवाळी सण घरात राहून साजरा करण्याचे आवाहन करण्यासोबतच परतूर व जालना येथे होणारी स्नेहसंमेलन रद्द करावे लागत असल्याची खंत असून, परतूर व जालना येथे जिह्यासह मतदारसंघातील जवळपास दहा हजार नागरिक या स्न्हेह मिलनाच्या माध्यमातून भेटीगाठी साठी येत असतात त्यात व्यापारी,डॉक्टर, वकील, शिक्षक, समाजातील प्रतिष्ठीता बरोबर विचारांची देवाण, घेवाण होते मात्र या वर्षी कोरोना संकटा मुळे हा कार्यक्रम करता येणार नसला तरी अनाथ आश्रमातील मुलांसोबत दिवाळी साजरी करीत असल्यामुळे आपण आनंदी असल्याचे ते म्हणाले पुढे ते म्हणाले की जिल्ह्यातील नागरिकांनी दिवाळी सण साजरा करताना कोरोणा विषयी जागरूक राहून हा सण आनंदाने साजरा करावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले व सर्वांना दीपावली व भाऊबीज, पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात