📰 ताज्या घडामोडी

भाजपाच्या आंदोलनाने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने अखेर बंदीवसातील मंदिरे उघडली --. देर आये..दुरुस्ती आये ...आठ महिन्यांनंतर मंदिरे उघडली परतुरात आ.बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत महादेव मंदिरात महाआरती

Shamsundar chittoda
16 नोव्हेंबर 2020⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

-

परतूर/प्रतिनिधी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील आठ महिन्यांपासून देशातील आणि राज्यातील सर्व मंदिरे बंद होती.काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मंदिरे उघडण्याची परवानगी दिली परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आजपर्यंत बंदीवासातील देवांची मंदिरे उघडण्याची परवानगी दिली नव्हती.भाविक भक्तांना मंदिरात दर्शनासाठी जाता येत नव्हते.यासाठी देशातील आणि राज्यातील साधू,संत,ऋषीमुनी यांनी तसेच भारतीय जनता पार्टीने मंदिरे उघडण्यासाठी मोठे आंदोलन केले होते.राज्यातील मंदिरे उघडण्यात यावी म्हणून माजी मंत्री तथा आ.बबनराव लोणीकर यांनी स्वतः महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,मुख्य सचिव यांना पत्रे लिहिली होती आणि या पत्रात मंदिरे उघडण्याबाबत विनंती केली होती. तसेच युवा मोर्चाचा माध्यमातून युवा मोर्चाचे महाराप्ट्राचे महामंत्री राहूल लोणिकर यांच्या मार्गदर्शना खाली राज्यातील आंदोलनाची आणि आ.लोणीकर यांच्या पत्राची दखल घेत राज्य सरकारने पाडव्यापासून राज्यातील मंदिरे उघडण्याची परवानगी देण्यात आली यानिमित्त आज सोमवारी (दि.१६) सकाळी राज्याचे माजी मंत्री तथा आ.बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत शहरातील महादेव मंदिराची दारे उघडून मंदिरात महाआरती करण्यात आली.यावेळी हर..हर..महादेवाचा गजर करण्यात आला.याप्रसंगी बोलताना आ.बबनराव लोणीकर म्हणाले की,राज्यातील मंदिरे आज महाविकास आघाडी सरकारने 'देर आये दुरुस्त आये' मंदिरे उघडली असून यामुळे भाविक भक्तांना राज्यातील पंढरपूर,तुळजापूर,आळंदी,शिर्डी,शेगाव,राजूर या प्रमुख मंदिरात आता दर्शन घेता येणार आहे.काही ठिकाणी खुले दर्शन न करता ऑनलाईन दर्शन करण्याची परवानगी दिल्याने अनेक भाविक भक्तांची अडचण होणार असल्याने आ.लोणीकर यांनी मास्क लावून कोरोनाचे सर्व नियम पाळून सर्वांसाठी मंदिरे खुली करून मुक्त दर्शन ठेवावे अशी राज्यातील साधू संतांची,पुजाऱ्यांची मागणी आहे हे सांगून सरकारने लवकरच यासाठी परवानगी द्यावी असे सांगितले.यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते भगवान मोरे,ओम मोर,युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संपत टकले,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे,युवा मोर्चा तालुका सरचिटणीस बंडू मानवतकर,युवा मोर्चा कोषाध्यक्ष अमर बगडीया,भाजपा शहराध्यक्ष राजेंद्र मुंदडा,नगरसेवक कृष्णा आरगडे,संदिप बाहेकर,पद्माकर कवडे,अमोल अग्रवाल,मंगेश वाघमारे,विष्णू मचाले,शुभम कठोरे,भरत अंभुरे,किरण अंभुरे,श्यामसुंदर चित्तोडा यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात