📰 ताज्या घडामोडी

परतूर येथे महिला अत्याचाराविरोधात भाजपा महिला आघाडीचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन* ======================= *सरकार महिला अत्याचाराबाबत गंभीर नाही* *आमदार लोणीकर यांचा आरोप* ======================= *महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी*

च
Shamsundar chittoda
14 ऑक्टोबर 2020•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर प्रतिनिधी राज्यातील आघाडी सरकार महिलांच्या अत्याचाराच्या संदर्भात गंभीर नसल्याचा आरोप माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे पुढे या पत्रकात म्हटले आहे की राज्यातील गृहखाते संवेदना हरवलेले असून गृहमंत्र्यांची या गोष्टीकडे लक्ष नसल्यामुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी बलात्कार अत्याचार विनयभंग अशा प्रकार चा अन्याय महिलांवर होत असून कोविड सारख्या महाभयंकर रोगाचा प्रादुर्भाव राज्यभरात असताना पनवेल येथे कोविड सेंटरमध्ये 40 वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेचा बलात्कार होतो ही गोष्ट अतिशय घृणास्पद असून राज्यात होणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांना पायबंद घालण्यात हे सरकार अपयशी ठरले असून सरकारला महिलांच्या बाबतीत कुठल्याही गोष्टीची घेणंदेणं नसल्याचे ही ते म्हणाले

राज्यातील सरकार कुंभकर्णी झोपेत असून ,महिला अत्याचार,अतिवृष्टी, महापूर या मुळे जनता हैराण असून सरकार मात्र या कडे डोळझाक करीत असल्याचे ते म्हणाले.

हे सरकार संवेदनाशुन्य असून या सरकारला जनतेनेच दुःख समजून घेत नसल्याने जनतेमध्ये तीव्र असंतोष असल्याचे सांगतानाच कोरोना सारख्या संवेदनशील विषयावर सरकार गंभीर नसून सरकारला महिलांचे दुःख दिसत नाही, वाढलेले अत्याचार ही अतिशय दुर्दैवी बाब असून महिलांना न्याया साठी रस्त्यावर उतरवण्यावच महापातक या सरकार चे असून सरकार कुठल्याच प्रश्‍नावर भूमिका घेत नसल्याने जनतेला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याचे ही ते म्हणाले

*परतूर तहसील समोर भाजपा महिला आघाडीचे जोरदार आंदोलन*

परतूर येथील तहसील कार्यालयासमोर माजी मंत्री बबनराव लोणीकर, भाजयुमो प्रदेश सरचिटणीस राहुल लोनिकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महिला आघाडी च्या वतीने जोरदार निदर्शने करीत ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकार च्या नाकर्तेपणा मुळे महिलांवर अत्याचार वाढले असल्याचे तहसीलदार यांना देण्यांत आलेल्या निवेदनात म्हंटले असून, पुढे या निवेदनात म्हंटले आहे की,भाजपच्या प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे यांनी दि 22 रोजी महाराष्ट्रभर महिला अत्याचाराच्या विरोधात राज्यभरात आंदोलन केले होते मात्र ठाकरे सरकारने या विषयावर कुठले ही पाऊल उचलले नाही या विरोधात भाजपा जिल्हाध्यक्ष जिजाबाई जाधव, परतूर पंचायत समितीच्या सभापती मंकरणा ताई येवले, पंचायत समिती सदस्य अनिताताई पाईकराव, भाजपा सरचिटणीस सिंधुताई बेरगुडे, त्याचबरोबर भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शत्रुघ्न कणसे, भाजयुमोचे सरचिटणीस रवी सोळंके बंडू मानवतकर सरपंच सोमनाथ मगर सुधाकर बेरगुडे पेंटर कवडे सरपंच अर्चना मगर शीलाताई पवार कावेरी पवार जया ताई भांडवलकर मीनाक्षी ताई मगर यासह अनेक महिलांची उपस्थिती या ठिकाणी होती

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→14 ऑक्टोबर 2020
पाहणी पंचनामे बस्स झाले, शेतकऱ्यानं तात्काळ आर्थिक मदतीची गरज -सचिन खरात*    *परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ*

पाहणी पंचनामे बस्स झाले, शेतकऱ्यानं तात्काळ आर्थिक मदतीची गरज -सचिन खरात* *परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ*

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात