📰 ताज्या घडामोडी

भाजयुमोचे प्रदेश महामंत्री लोणिकर यांचे बागेश्वरी साखर कारखाना चेअरमन यांना निवेदन

Shamsundar chittoda
31 ऑक्टोबर 2020⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर व मंठा तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या पैशावर उभा राहणाऱ्या या कारखान्याने सर्वप्रथम परतूर व मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस प्राधान्याने संकलित करणे आवश्यक आहे परंतु असे न करता कारखान्याकडून कार्यक्षेत्र बाहेरचा ऊस नोंदणी करून संकलित करण्याचा कुटील डाव आखला जात आहे ही बाब अत्यंत गंभीर असून जोपर्यंत कार्यक्षेत्रातील ऊस पूर्णपणे संकलित केला जात नाही तोपर्यंत कार्यक्षेत्र बाहेरचा ऊस आणू देणार नाही अशी आक्रमक भूमिका भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी घेतली.

*लोणीकर यांच्या या आक्रमक भूमिकेसमोर कारखाना प्रशासन झुकले असुन कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस संकलित केल्याशिवाय बाहेरचा ऊस आणणार नाही अशा शब्दात कारखाना व्यवस्थापनाने लोणीकर यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला शब्द दिला. माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वात आज परतूर व मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनाची भेट घेऊन आक्रमकपणे शेतकऱ्यांची भूमिका मांडली.*

परतूर व मंठा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपले शेत, कुटुंबाचे दागदागिने गहाण ठेवून, त्याकाळात व्याजाने पैसे घेऊन कारखाना उभारणी करताना शेअर्स घेतलेले आहे आज श्रद्धा एनर्जी प्रा.लि. असणारा तत्कालीन बागेश्वरी सहकारी साखर कारखाना त्याचे संस्थापक चेअरमन कै.माजी आमदार वैजनाथराव आकात यांनी काही दिवस हा कारखाना चालवला त्यानंतर इतर लोकांच्या हाती कारखान्याची ची सूत्रे गेली आणि त्यानंतर कारखान्यात शेतकरी हितापेक्षा राजकारणाचा जास्त विचार केला गेला आणि त्यामुळे पुढे हा कारखाना विक्री काढणे इतपत गंभीर परिस्थिती निर्माण झाली. मध्यंतरीच्या काळात पावसाचे प्रमाण कमी झाले, उसाची लागवड देखील कमी झाली, परिणामी कारखाना बंद पडला. परंतु निम्न दुधना प्रकल्पातील मुबलक पाण्यामुळे *आता कार्यक्षेत्रात भरपूर ऊस असून तो पूर्णपणे संकलित केल्या शिवाय कार्यक्षेत्र बाहेरचा पाऊस संकलित करणे म्हणजे स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचे मत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले होते* त्या पार्श्वभूमीवर आज युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह कारखाना व्यवस्थापनाची भेट घेतली.

"बागेश्वरी" कारखाना उभा करताना परतूर आणि मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांचा घामाचा पैसा कारखान्यासाठी शेतकऱ्यांनी दिला आहे, कार्यक्षेत्रातील स्थानिक शेतकऱ्यांना डावलून शेतकर्‍यांशी केली जाणारी बेइमानी भारतीय जनता पार्टी, भाजपा युवा मोर्चा आणि या दोन्ही तालुक्यातील शेतकरी कदापि सहन करणार नाहीत हे देखील कारखाना व्यवस्थापनाने लक्षात घेणे गरजेचे आहे. असा स्पष्ट इशारा राहुल लोणीकर यांच्यासह शिष्टमंडळाने कारखाना व्यवस्थापनाला जिल्हा आहे

जोपर्यंत कार्यक्षेत्र मधील ऊसाची नोंदणी होत नाही तोपर्यंत कार्यक्षेत्र बाहेरच्या ऊसाची नोंदणी करण्यात येऊ नये. याबरोबरच जोपर्यंत कारखाना कार्यक्षेत्र मधील संपूर्ण ऊस संकलित होत नाही तोपर्यंत कार्यक्षेत्राच्या बाहेरचा ऊस संकलित करण्यात येऊ नये. अशा मागण्यांचे निवेदन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल लोणीकर आणि उपस्थित शेतकरी शिष्टमंडळाने कारखाना व्यवस्थापनाला दिले

यावेळी परतुर तालुकाध्यक्ष रमेश भापकर, मंठा तालुका अध्यक्ष सतीश निर्वळ, विलास आकात सभापती संदीप गोरे सभापती रंगनाथ येवले उपसभापती रामप्रसाद थोरात उपसभापती नागेश घारे उपसभापती राजेश मोरे जि प सदस्य पंजाब बोराडे संभाजीराव खंदारे हरिराम माने दिगंबर मुजमुले शिवाजी पाईकराव विठ्ठलराव काळे सुभाष राठोड रामेश्वर तनपुरे दत्तराव कांगणे युवामोर्चा सरचिटणीस संपत टकले युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शत्रुघ्न कणसे गजानन लोणीकर सुधाकर बेरगुडे अशोकराव बरकुले युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गजानन उफाड निवास देशमुख प्रवीण सातोनकर कृष्णा आरगडे अंकुशराव नवल बबलू सातपुते रवी सोळंके अभिषेक सोळंके ज्ञानेश्वर कांदे संभाजी वारे नारायण बागल राजू ढवळे सिद्धेश्वर मगर सिद्धेश्वर केकाण भुजंग करपे सरपंच नदी पटेल युसुफ पठाण गुलाब सावंत उद्धव गोरे सचिन घाडगे जालिंदर राठोड बाळासाहेब तौर महादेव वाघमारे परमेश्वर केकान गोविंद खरात बंडू मानवतकर शरद मोरे दत्ता धुमाळ विष्णुपंत उगले अरुण खराबे भागवत बागल यांच्यासह दोन्ही तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात