📰 ताज्या घडामोडी

स्वसंस्कृतीची ओळख आणि संघटनाच परिवर्तनाचा मार्ग डाँ प्रमोद आकात यांचे दुधा येथेप्रतिपादन, संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समाजाला आत्मभानाची गरज छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून एकतेचा संदेश, दूध येथे विराट हिंदू संमेलन संपन्न

Shamsundar chittoda
7 एप्रिल 2026⏱️ ४ मिनिटे वाचन
WhatsApp

तळणी येथून जवळच असलेल्या दूधा येथे आयोजित विराट हिंदू संमेलनात डॉक्टर प्रमोद आ कात यांनी मार्गदर्शन केले हिंदू समाजाने आपल्या मूळ संस्कृतीची आणि ओळखीची जाणीव ठेवणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादित केले संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर समाजाने आत्मपरीक्षण करून संघटनाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले कोणत्याही समाजाचे संघटन करण्यासाठी त्या समाजाला स्वतःची ओळख असणे अत्यंत गरजेचे आहे मी कोण आहे माझी संस्कृती काय माझा इतिहास कोणता आहे याची जाणीव झाल्याशिवाय खरी संघटन होऊ शकत नाही समाज परिवर्तन हे एकट्याची काम नसून संपूर्ण समाजाच्या एकत्रित प्रयत्नातूनच ते शक्य होते असे यासाठी आपल्यात समन्वय असणे गरजेचे आहे

इतिहासाचा संदर्भ देत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या जीवनातून संघटन आणि स्वराज्याची प्रेरणा घ्यावी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जोडलेला प्रत्येक मावळा हा हिंदवी स्वराज्याचे भगवे तोरण डोलाने सतत फडकत राहावे यासाठी त्यांनी संघर्ष केला प्रभू श्रीराम आणि प्रभू श्रीकृष्ण यांच्या आदर्शचा उल्लेख करून भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा यावेळी त्यांनी अधोरेखित केली

आजच्या परिस्थितीत देशावर विविध प्रकारचे सूक्ष्म आक्रमण होत असल्याने त्यावर आपण गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे या आव्हानांना तोंड देण्यासाठी समाज एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे हिंदू हा शब्द केवळ धर्माशी संबंधित नसून तो एक जीवन पद्धती आणि संस्कृतीचे प्रतीक आहे ते प्रतीक आणि आपली संस्कृती प्रत्येकाने जपणे ही सध्या काळाची गरज बनली आहे

इतर देशांमध्ये राष्ट्रही केवळ भौगोलिक संकल्पना असते मात्र भारतात राष्ट्र म्हणजे भारत माता त्यामुळे राष्ट्र रक्षणासाठी प्रत्येकाने सजग राहून संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे आपण सर्व एका मातेचे लेकर आहोत त्या भारत मातेला परम हे भावाला नेण्यासाठी आपसातील मतभेद हे बाजूला सारून आपण सगळे बंधू आहोत ही भावना निर्माण होऊन हातात हात घालून पुढे चालणे तेव्हाच कुठे संघटनेचे फलित मार्गी लागेल

छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर मंदिरात घेतलेल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या शक्तीचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की त्यांनी सर्व समाज घटकांना एकत्र आणून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच धर्तीवर आजही समाजाने एकत्र येऊन संस्कृतीचे रक्षण आणि समाजाचे परिवर्तन साध्य करावे असा संदेश त्यांनी यावेळी दिला

चौकट

संघशताब्दीच्या निमित्याने संघाने पंचसूत्रीचा जागर या हिंदू संमेलनाच्या माध्यमातून सुरू केला आहे सामाजिक समरसता पर्यावरण संरक्षण कुटुंब प्रबोधन व आधारित जीवन नागरिक कर्तव्य या पंचसूत्रीचा वापर प्रत्येकाने करणे गरजेचे आहे या पंचसूत्रीचा वापर प्रत्येक हिंदूंनी अमलात आणावा असे आवाहनही त्यांनी शेवटी केले

भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये कुटुंबाचे विशेष महत्त्व आहे भारतीय अध्यात्मिक दृष्टीने कुटुंब म्हणजे मी पासून आम्ही असे आहे शहरीकरण आणि बदलेली जीवनशैली गतीमानता वाढल्यामुळे कुटुंब छोटी झाली आहे यामुळे परिवारातील सर्व जणांनी आठवड्यातून किमान एकदा तरी घरी एकत्र राहणे श्रद्धेनुसार भजन करणे एकत्र भोजन करणे गप्पा मारणे आपल्या कुळ परंपरा काय चांगले काय वाईट काय यासंदर्भात चर्चा करणे आपली पूर्वज त्यांचा इतिहास याची उजळणी करणे यामुळे कुटुंबातील मतभेद होणार नाहीत याची दक्षता घेणे ही सध्या काळाची गरज आहे

आज हिंदू संमेलनाची गरज का वाटत आहे याचा विचार आपण प्रत्येकाने करणे गरजेचे आहे कुठल्याही जाती पातीच्या राजकारणाला बळी न पडता आपण हिंदू आहोत ही एकमेव भावना डोळ्यासमोर ठेवून एकमेकाबद्दल द्वेष न ठेवता आदरपूर्वक व्यवहार आपला असला पाहिजे जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानेश्वर महाराज यांनी धर्म संरक्षणासाठी लिहून ठेवलेले वांग्मय आपल्यासाठीच आहे संतांची दूरदृष्टी व वाङ्मयातून व त्यांच्या रचनेतून आपल्याला दिसून येते येणाऱ्या काळातील आव्हाने यासाठी त्यांच्या वाङ्मयातील मार्गदर्शक तत्वे आपल्यासाठी आज आदर्श व मार्गदर्शक ठरत आहे याचा स्वीकार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ह भ प ज्ञानेश्वर माऊली वाघाळेकर यांनी या प्रसंगी केले

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दुधासह पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी उपस्थिती होती यावेळी तालुका संघ चालक बालासाहेब बोराडे कृष्णाजी शेरे , सुरेश देशपांडे गणेश राऊत रामेश्वर खुळे सरपंच अजय जाधव सतीश खुळे यांची उपस्थिती होती

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात