📰 ताज्या घडामोडी

कानडीतील अखंड हरिनाम सप्ताहात भक्तिरसाची उधळण,देव देश आणि धर्मासाठी जगणे काळाची गरज,पच्चावन्नाव्या वर्षीही परंपरा अखंड; ह.भ.प. तुकाराम महाराज पारधी यांची कीर्तनसेवा

Shamsundar chittoda
4 मार्च 2026⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

तळणीपासून जवळ असलेल्या कानडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी भक्तिरसाचा महासागर उसळला. यंदा या सप्ताहाचे पच्चावन्नावे वर्ष असून श्री कानिफनाथ मंदिर परिसरात शिवमहापुराण गाथा, हरिभजन व सायंकाळी कीर्तन असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

दुसऱ्या दिवशी ह.भ.प. तुकाराम महाराज पारधी यांच्या ओजस्वी वाणीतील कीर्तनसेवा संपन्न झाली. “जग झोडी, जग जोडी, नाव ठेविले लाडी” या संत एकनाथ महाराज यांच्या अभंगावर आधारित निरूपण करत त्यांनी उपस्थित भाविकांना भक्ती, सदाचार आणि नामस्मरणाचा गूढ अर्थ समजावून सांगितला.

“घरी बसून करा नामस्मरण; गंगा तुमच्यापर्यंत येईल”

कीर्तनादरम्यान महाराजांनी सांगितले की, “तुमच्या अंतःकरणातील पाप नष्ट व्हावे, द्वेषभाव नाहीसा व्हावा, यासाठी शरणागती आवश्यक आहे.” काही भाविकांनी “आमच्याकडे तीर्थयात्रेला जाण्यासाठी पैसा नाही, साथ नाही” अशी व्यथा मांडली असता त्यांनी अत्यंत सोप्या शब्दांत मार्ग दाखवला—

तीर्थावर जाता येत नसेल तर घरीच बसा; पण मुखाने ‘गंगा गंगा’ म्हणा. नामस्मरणानेच तीर्थाचे पुण्य लाभते.”

वारकरी संप्रदायाच्या परंपरेत नाममहिमा सर्वोच्च असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “आपला हा संप्रदाय केवळ परंपरा नसून जीवनाला दिशा देणारा आध्यात्मिक मार्ग आहे,” असेही ते म्हणाले.

व्यसनमुक्तीचा संदेश; तरुणाईला जागृतीचे आवाहन

सध्याच्या तरुणाईला पोखरणाऱ्या व्यसनाधीनतेवर त्यांनी परखड भाष्य केले.

“अजून वेळ गेलेली नाही. तरुणांनी स्वतःची संगत तपासावी. व्यसनांनी ग्रासलेल्या बांधवांनी हरीनामाची कास धरली तर त्यांचा उद्धार निश्चित आहे,”

वेळेला महत्व द्या संपत्तीला महत्व देऊ नका संपत्ती ही मनुष्याला प्रारब्धानुसार मिळत असते आजकाल तरुणांचं रक्त हे देशाच्या सिमेवर सांडण्यांची गरज असतांना ते रक्त रत्त्यावर साडत आहे . ही खंत महाराजांनी यावेळी बोलून दाखवली . स्वःत नाव करण्यासाठी स्वःत ला कर्म चांगले करावे लागेल तरच आपला नावलौकिक प्राप्त होईल . सध्या धर्मावर आघात येत आहे त्यासाठी आपल्याला मतभेद बाजूला सारून एकञ येणे ही काळाची गरज आहे तरुणाला जर दिशाहीन व्हायचे नसेल तर त्यांनी संत संगतीचा सहवासात राहण्याची काळची गरज आहे

असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. देव, देश आणि धर्म यांचा विचार करून धर्माचे आचरण करणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हिंदवी स्वराज्याचा स्मरणोत्सव

कीर्तनात राष्ट्रभक्तीचाही सुर उमटला. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्याग, बलिदान आणि समर्पणामुळेच आज भगवा ध्वज दिमाखात फडकत असल्याचे त्यांनी सांगितले.

सीमेवरील सैनिकांच्या बलिदानाचा विसर पडता कामा नये, त्यांच्या त्यागामुळेच आपण सुरक्षित आहोत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

निस्वार्थ भक्तीच देवाला प्रिय

मनुष्याच्या अंतःकरणातील दोष भक्तीच्या साधनेने नाहीसे होतात. निस्वार्थ भावनेतून केलेली भक्ती देवाला प्रिय असते आणि त्यामुळे द्वेषभावना निर्माण होत नाही, हा संदेश संत एकनाथ महाराज यांच्या अभंगातून स्पष्ट होतो, असे सांगत महाराजांनी कीर्तनाची सांगता केली.

कानडीतील अखंड हरिनाम सप्ताहात दररोज शिवमहापुराण गाथा, भजन आणि कीर्तनाचा आध्यात्मिक सोहळा रंगत असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. पच्चावन्नाव्या वर्षीही ही परंपरा तेवढ्याच उत्साहात आणि श्रद्धाभावाने पुढे जात असल्याचे चित्र दिसत आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात