📰 ताज्या घडामोडी

जगाला एक मार्गाने आणायचे असेल किर्तनाशिवाय पर्याय नाही - हभप प्रकाश महाराज जाबकर

Shamsundar chittoda
16 मार्च 2025⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

कानडी येथे चालू असलेल्या अंखड हरीनाम सप्ताहच्या तिसर्या दिवशीची किर्तन सेवा ह भ प प्रकाश महाराज जाबकर याची झाली किर्तन चांग किर्तन चांग होय अंग हरीरूप प्रेमे छंदे नाचे डोले हारपले देहभाव या जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील अंभगावर निरूपण केले

जगाला एक मार्गाने आणायचे असेल किर्तनाशिवाय पर्याय नाही जग हे आडरानाने पडले आहे त्या जगाला मार्गावर आणायचे असेल जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्याचा भक्कम आधार घ्यावा लागेल तो आधार कुठे असेल तर वारकरी संप्रदायात आहे या ठिकाणी साधना करा तीला कुठेच बंधन नाही जगदुरु तुकोबानी नाथ महाराजाच्या एक हजार अंभगांचा चिकाटीने मेहनतीने अभ्यास करून हजारो अंभग आपल्या साठी दिला . संसारीकाला देव तेव्हाच आठवतो जेव्हा तो संकटात सापडलेल्या अवस्थेत असतो मनुष्यांने नामचिंतानाला कुठलीच काळ वेळ बघीतली नाही तुकाराम महाराजांनी आपल्या सारख्यांना परमार्थ घडावा म्हणून स्वःतच्या आयुष्याची आहुती दिली . मनुष्याला दिलेला नरदेह हा आपण व्यसणाच्या आहारी दिला आहे तो देह नामचितनाच्या कामी आला तर आपल्या जीवनाचे सार्थक झाल्या शिवाय राहणार नाही परमार्थ हा तरुणपणातच केला पाहिजे परंतू आपण परमार्थ हा उतारवयात करतो जे भगवताला कसे मान्य होईल

मनुष्याच्या ह्दय काळे आहे म्हणून त्याला देवाचे रूप सुंदर कसे दिसेल आपल्या परमार्थिक साधनेत सुंदरता वयापकता व नियमितता जर आली तर देव आपल्याला सुंदरच दिसणार यात शंका नाही . मनुष्याला मरण चुकवायचे असेल तर तुम्हाला धर्म मंडपांचा भक्कम आधार घ्यावाच लागेल सप्ताह परिवर्तनाचे साधन आहे ते सात्विक परिवर्तन संस्कार भक्ती साधना संतांचे अभंग संताचे विचार आत्मसात सप्ताहातच होते ते मनुष्याने मनापासून स्वीकारले तर सप्ताहाचे फलित झाल्या शिवाय राहणार नाही या कलयुगात भक्ती साधनेला जेवढे महत्व मनुष्य देईल ना तितका तो अध्यात्मीक दुष्टीने परीपक्क होईल द्वेष भावना त्याला शिवणार नाही गरज आहे ती साधना मनाभावातून करण्याची देवाचे चिंतन केल्यावर देह हा हरीरूप झाल्या शिवाय राहणार नाही . परंतू ससार रूपी सांपाने मनुष्याला दंश केला आहे तो दंश संतांला केलेला नाही कारण संताच्या अंतरगात परमार्थिक साधनेशीवाय काहीच नाही . परंतू संसारीकीच्या अंतररंगातत फक्त संसारच आहे त्यामुळे त्याच्या मनावर परमार्थिक साधनेचा प्रभाव होत नाही परमार्थिक अंतररंग प्राप्त करायचा असेल तर लोभी संसाराचा त्याग करावाच लागेल . ससारातून बाहेर पडल्या शिवाय देव भेटणार नाही संसारांचे मायाजाळ . इतके घट्ट आहे की त्याचा मोह मनुष्याला सुटत नाही . तुकोबारायांनी किती त्याग देवाला प्राप्त करण्यासाठी केला आहे त्या त्यागाच्या जोरावर पांडूरंग परमात्मा त्याच्या पाठीमागे ठाम उभा राहिला .

चौकट

नामचितन करायची संधी आपल्याला देवाने दिली आहे देवाचे अस्तीत्व या जगात आहे ते आपल्याला दिसत नसले तरी त्याचे अस्तीत्व आपण नाकारू शकत नाही तो व्यापकच आहे तो आपल्या साठी येत नाही याचे कारण आपली भक्ती नाही तेवढी साधना नाही ती साधना फक्त ज्ञानोबा तुकोबा कडे त्याच साधनेचे मनुष्याने किमान अनुकरन करणे गरजेचे आहे

आपली एकत्रित कुटुंब व्यवस्था लोप पावत जात असल्याने घरात एकोपा राहीला नाही तो अबोलाच आपल्या नात्यात दुरावा निर्माण करत असल्याने नात्यात प्रेम राहीले नाही त्यामुळे एकत्रीत कृटूब व्यवस्था कायम राहणे गरजेचे आहे

वाल्या कोळीला सुद्धा दुष्ट संगतीचा सहवास होता परंतू त्यांच्यावर सुद्धा झालेला भक्तीचा प्रभाव अजरामर करून गेला आपण परमार्थात झोपलेले आहोत आणि संसारात जागे आहोत संसारातील जागेपण आपल्याला तारणार नाही आपल्याला परमार्थिक साधनेचाच सहवासच आपल्याला तारु शकतो म्हणून मनुष्याने निस्वार्थ भावनेने परमार्थीक साधनेचा स्वीकार करून आपला उध्दार करून घ्यावा त्यातच आपले हीत असल्याचे महारांजानी शेवटी सांगीतले

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात