📰 ताज्या घडामोडी

एक सोहळा प्रभू रामचद्राच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आहे जो तुम्हा आम्हाला पाहायला मिळाला असल्याने आपण खरच भाग्यवान आहोत- ह भ प विष्णू महाराज बादाड

Shamsundar chittoda
26 मार्च 2024⏱️ ५ मिनिटे वाचन
WhatsApp

मनुष्याच्या जिवनामध्ये अनेक सोहळे आहेत तुमचे आमचे सोहळे जिवन मरणाचा सोहळा जिवाचा सोहळा आहे एक पदमीनीचा सोहळा एक सोहळा वारीचा आहे एक सोहळा नाम चितंनाचा आहे एक वैकृठ गमनाचा सोहळा आहे एक ज्ञानोबाच्या समाधीचा सोहळा आहे आणि एक प्रभू रामचद्राच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आहे जो गेल्या पाचशे दशकाच्या नंतर तुम्हा आम्हाला पाहायला मिळाला असल्याने आपण खरच भाग्यवान आहोत असे प्रतिपादन ह भ प विष्णू महाराज बादाड यानी कानडी येथे केले दरवर्षी कानडी येथे श्री कानीफनाथाच्या उत्सवाच्या निमित्याने सप्ताहाचे आयोजन ग्रामस्थाच्या वतीने करण्यात येत असते व प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्य या वर्षी रामकथेचे आयोजन करण्यात आले असुन सप्ताह च्या तिसर्या दिवशीच्या सेवेत बोलत होते

प्रभू रामचद्र याची स्वामीकाज गुरू भक्ती पितृवचन सेवाभक्ती यावर महाराजानी निरुपण केले . स्वामी भक्ती काय असावी याचे उदाहरण म्हणजे हनुमंतराय आहे निस्वार्थ प्रभूरामचद्रांची सेवा करण्याचे परमभाग्य मारोतीरायांना मिळाले . स्वामी म्हणजे मालक .. आणि काज म्हणजे काम करणारे स्वामीची सेवा कशी करावी याचे उत्तम उदाहरण मारोतीराय आहे . गुरुवर किती निष्ठा ठेवावी याचे उत्तम उदाहरण शबरी माता आहे . आणि पितृ वचन कसे पाळायचे याचे उदाहरण म्हणजे प्रभू श्रीराम .वडीलाचे वचन म्हणून चौदा वर्ष वनवास स्वीकारला म्हणुन जगात रामाचा आदर्श मोठया प्रमाणात आहे सेवाप्रती या साठी सीतामाईची साधना मोठी आहे रामाबरोबर चौदावर्ष वनवासात राहुन पतीची सेवा करणारी सीतामाता आजच्या मातासाठी आदर्शच असायला हवी तरच ती एक आदर्श माता ठरेल

सध्याच्या धकाधकीच्या काळात मनुष्याला परमार्थाक साधनेची नितात गरज आहे कारण स्वःत स्वार्थापोटी मनुष्य भरकटत चालला आहे . त्यासाठी त्याला परमार्थाक साधनेची व सहवासाची गरज आहे येणारा काळ हा आव्हानात्मक असला तरी त्याला परमार्थीक साधनेची जोड दिली तर धर्माचा विजय झाल्याशिवाय राह नार नाही त्याच्या आयुष्याचा उध्दार झाल्याशिवाय राहणार नाही श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश मानवी जीवनाचा कल्याण्याचा उपदेश आहे तो मनुष्याने जर स्वीकारला तर या ही रामकथा सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही

मनुष्याच्या जिवनात सुखाची समाधानी कमी आहे माणसाचे जिवन जगत असताना त्याचे कर्तृत्व सिध्द करत असताना यश मिळवत असताना किवा कोणतीही क्रिया करत असताना त्यामध्ये सुख आणि समाधान महत्वाचे आहे सुख हे कोणालाच नको असे कोणी मनुष्य जिवाची धडपड ही सतत सुख कश्यात मिळेल हे शोधत असतो त्याला दुःखाची प्राप्ती कधीच होऊ नाही यासाठी जसा तो धडपडतो तसा तो भगवंत भक्ती साठी तडफडला पाहीजे तरच त्याला सुखाची प्राप्ती होईल मनुष्याच्या जिवनात सुखाची कमतरता असता तुम्ही कीतीही कर्म करा तुम्ही कितीही देव देव करा भगवतांची साधना करा तरी सुध्दा त्याला दुःख असते भगवतांचे सेवा करतो नामस्मरण करतो तरी ही त्याच्या वाट्याला दुःख का ?

मनुष्य श्रद्धेने निष्ठेन भगवतांची सेवा करत असेल आणि तरी त्याच्या नशीबी दुःख येत असेल तर ती भगवंताची योजना समजावी कारण माझ्या भक्ताला पूढच्या जन्मी दुःखाचे कष्ठ सोसायाला नको ते याच जन्मात फेडून घ्यायचे म्हणून तो ते कर्म याच जन्मात फेडून घेत असतो म्हणून त्याला दुःखाची प्राप्ती होती मणुष्याला कर्म कधीच चुकत नसतात ते भोगावे लागतातच मनुष्य जीवनात येऊन सुखा साठी जप तप साधना व्रत वैकल्य सगळे केले कोणत्या पदवी पर्यन्त जाऊ म्हणजे मला दुःख मिळणार नाही तरी माझ्या नशीबात दुःख का मी माणूस आहे सगळ्या गोष्टी मिळतात पण सुख का मिळत नाही नेमकी कोणती गोष्ट करु म्हणजे मला सुख मिळेल असा प्रश्न जेव्हा आपल्याला पडतो . विचारला जातो तेव्हा म्हणतात ज्या भंगवंताचे तुम्ही चितंन श्रवण करतात ना त्याचे तुम्ही दास व्हा त्याला वाहवून घ्या तुमच्या सर्वकाळ त्याच्या चरणाशी समर्पित करा तेव्हा तुमच्या कडे सुखाची नांदी नादेल.

जो सर्वकाळ भगवतांचा दास आहे त्याच्या ठिकाणी सुखाचा कल्लोळ आहे जो त्याचा दास होईल त्याच्या जवळ सुखाची साठवण तो करत असतो भगवतांच्या नाम चितणात हरवून जाणे म्हणजेच त्याचे दास होणे होय त्याचा दास होणे म्हणजे वेगळे काही नाही त्याचे चितन मनन करणे त्याचे सेवक होणे म्हणजेच दास होणे आणि दास झाल्यावर सुख हे मिळणारच आहे कारण भगवतांला ही भक्ती साधना प्रिय आहे तिचे दास्यत्व स्वीकारले की सुखाची कृपाद्रस्टी केल्याशिवाय तो थांबत नाही कारण त्याचे दास्यत्व स्वीकारले की मनुष्याच्या पूण्याच्या साठ्यात भर पडते ती ती पडली की सुखाची प्राप्ती त्याच्या पदरात पडल्याशिवाय राहत नाही.

प्रभू श्रीरामाचा अवतार म्हणजे धर्माच्या सरंक्षणासाठी झाला आहे चतुर्भुज अवतारात झाला आहे . एक वचणी राम हा जगाच्या कल्याणाचा अवतार असून . त्याचा आदर्श मानवाने आपल्या आयुष्यात स्वीकारला पाहीजे. रामभक्त असणे म्हणजे सांसारिक जीवनाची नाव भवसागराच्या किणार्याला लागल्याशिवाय राहनार नाही

परमार्थाची सेवा आपल्या हाडात राहीली पाहीजी त्याची साधना आपल्या चितात राहीली पाहीजी म्हातारपणात गळ्यात माळी घालून उपयोग नाही परमार्थाची लथ मनुष्याला लागली तर त्याच्या कडे सुखाची प्राप्ती शिवाय दुसरे काही नसनार आहे गरज आहे त्याचे दास्यत्व स्वीकारायची तरच आणि तरच तुम्हा आम्हाला सुखाची प्राप्ती होऊन जीवनाचा उध्दार झाल्याशिवाय राहणार नाही असे महाराजांनी शेवटी सांगीतले

अयोध्या येथील प्रभू श्रीरामाचे मंदीर हे राष्ट्र मंदीर असुन अनेक कारसेवकाच्या बलीदानातून ते मिळवले आहे मोठा सघर्ष या साठी करावा लागला तंबूत राहणार्या जगाच्या मालकाचा खरा वनवास आता संपला आहे त्याला दंडवत घालण्यासाठी सवडीनुसार सर्वानी जावे असे महाराजांनी शेवटी सांगीतले

कानडी येथे रंगपंचमी हा सण दरवर्षी काल्याच्या दिवशी साजरा करण्यात येतो सपूर्ण गावातुन कानीफनाथाची मिरवणूक निघते याच दिवशी ग्रामस्थ रंगोत्सव मोठया श्रध्देने साजरा करतात

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात