📰 ताज्या घडामोडी

मराठवाडा- विदर्भाची वाटचाल अनुशेषाकडून कालबद्ध विकासाकडे,सरकारच्या विकास मोहिमेचे भाजपा कडून स्वागत,महाविकास आघाडीने सातत्याने अन्याय करून रोखलेल्या विकासाच्या वाटा आता मोकळ्या- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

Shamsundar chittoda
30 डिसेंबर 2022⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

आजपर्यंत केवळ सरकारी उपेक्षेमुळे विकास, सिंचन आणि कृषी क्षेत्राच्या समस्यांनी ग्रासलेल्या विदर्भ, मराठवाडा या अनुशेषग्रस्त भागांना प्रथमच विकासाची चाहूल लागली असून शिंदे-फडणवीस सरकारने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जाहीर केलेल्या विविध योजनांमुळे या भागाच्या विकासास चालना मिळणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीने सातत्याने अन्याय करून रोखलेल्या विकासाच्या वाटा आता मोकळ्या झाल्याने राज्यात खऱ्या अर्थाने विकासाभिमुख वाटचाल सुरू झाली आहे, अशी भावना माजी मंत्री आमदार श्री. बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडी सरकार असताना त्यावेळचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यास नकार दिला होता , याची आठवणही माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी करून दिली आहे.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपुरात घेण्यामागे या भागातील अनुशेषाच्या मुद्द्यांवर तोडगा काढून विकासास चालना द्यावी हाच उद्देश होता. पण आजवर केवळ राजकीय हेवेदावे आणि कुरघोडीच्या राजकारणातच हिवाळी अधिवेशने गाजविली गेली, आणि समस्यांची सतत उपेक्षा झाली. महाविकास आघाडी सरकारने तर दोन वर्षे नागपुरात अधिवेशनही घेतले नाही. यावरूनच महाविकास आघाडीची विदर्भावरील अन्यायाची भावना स्पष्ट होते. दोन वर्षांनंतर प्रथमच झालेल्या हिवाळी अधिवेशनात विदर्भ-मराठवाड्यासाठी विविध योजना जाहीर करून शिंदे-फडणवीस सरकारने अन्याय दूर करण्यास सुरुवात केली आहे, असे ते म्हणाले. ‘विदर्भ मराठवाडा मजबूत तर महाराष्ट्र मजबूत’ ही मुख्यमंत्र्यांची घोषणा विदर्भास दिलासादायक असून धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपये बोनस, विदर्भासाठी पर्यटन सर्किट, नवे खनिज धोरण, समतोल विकासासाठी नवी समिती, समृद्धी महामार्ग, नागपूर, वर्धा येथील नियोजित लॉजिस्टिक हब, शक्तिपीठ महामार्ग, गोसीखुर्दचा पर्यटन प्रकल्प, लोहखनिज प्रकल्प व नवे खनिज धोरण, शेतमालाच्या मूल्य साखळ्या तयार करण्याचे धोरण, वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प, पारशिवनी येथील रखडलेल्या पेंच प्रकल्पास वेग, तलावांची दुरुस्ती, जलयुक्त शिवार योजनेस गती, नवे वस्त्रोद्योग धोरण, अशा विकास योजनांची घोषणा करून शिंदे-फडणवीस सरकारने अनुशेषाकडून विकासाकडे वाटचालीची पायाभरणी केली आहे, अशा शब्दांत श्री. लोणीकर यांनी समाधान व्यक्त केले.

आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात विदर्भ, मराठवाड्याच्या अनुशेषात भर पडलीच, पण संपूर्ण महाराष्ट्राचेच विकासचक्र उलटे फिरले. कोविडचे निमित्त करून घरबसल्या राज्यकारभार करणाऱ्या वसुली सरकारमुळे अनुशेषग्रस्त भागास सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले. याची भरपाई करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने या भागाच्या विकासासाठी ठोस उपाययोजना सुरू केल्याने, नव्या दमाने विकासाचे वारे वाहू लागतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र या तीनही वैधानिक विकास मंडळांचे पुनर्गठन आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेस गती देऊन महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक लाख कोटींच्या शिखरावर नेण्यासाठी सुरू केलेले कालबद्ध प्रयत्न यांतून सरकारची विकासाची दृष्टी स्पष्ट झाली आहे, असे ते म्हणाले.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात