📰 ताज्या घडामोडी

प्रत्येक राष्ट्राभिमानी व्यक्तीच्या घरावर तिरंगा ध्वज फडकेल - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन,स्वर्गीय अटलजींमुळे आज प्रत्येक घरावर झेंडा फडकवण्याचा सर्वसामान्यांना अधिकार, मोदीजींनी केली अटलजींच्या आदेशाची अंमलबजावणी- लोणीकर

Shamsundar chittoda
6 ऑगस्ट 2022⏱️ ७ मिनिटे वाचन
WhatsApp

पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व राष्ट्रभिमानी जनता भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत परतूर विधानसभा मतदारसंघासह मराठवाडा विभागातील घरे, सरकारी/खाजगी आस्थापना तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी घरोघरी तिरंगा अभियान राबवण्यात यावे यासाठी प्रशासनासह प्रत्येक राष्ट्राभिमानी व्यक्ती तत्पर असून संपूर्ण महाराष्ट्रात हे अभिमान मोठ्या प्रमाणात राबवले जाणार आहे त्यासाठी परतूर विधानसभा मतदारसंघ पूर्णपणे सज्ज असून प्रत्येक राष्ट्राभिमानी व्यक्तीच्या घरावर तिरंगा ध्वज फडकेल असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज केले.

“हर घर तिरंगा” उपक्रमाच्या प्रचार प्रसिध्दी व जनजागृतीसाठी आयोजित मेळाव्या प्रसंगी श्री लोणीकर बोलत होते यावेळी मंचावर जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड सभापती संदीप भैया गोरे भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे तालुका अध्यक्ष सतीश निर्वळ माऊली शेजुळ पंजाबराव बोराडे बिडी पवार नागेश घारे राजेश मोरे जिजाबाई जाधव विकास पालवे गजानन देशमुख नाथराव काकडे प्रसाद बोराडे उद्धव गोंडगे सुभाष राठोड नरसिंग राठोड प्रसादराव गडदे नवनाथ खंदारे नारायण दवणे यांची प्रमुख उपस्थिती होती यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या काळात जनतेच्या घरावर, सार्वजनिक ठिकाणी, धार्मिक संघटना, इत्यादी ठिकाणी ध्वजारोहण करण्याची परवानगी नव्हती. झेंडा देशभक्तीच,अस्मितेच प्रतीक असतो. स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपयी यांनी केलेल्या कायदा "झेंडा अधिनियम २००२" मुळे आज घरा घरात झेंडा वंदन होत आहे. अटलजी च्या सरकार ने भारतीय झेंडा वंदन वरील सर्व निर्बंध २००२ मध्ये हटवले. काँग्रेस सरकारचा 'झेंडा अधिनियम १९५०' च्या कायद्यानुसार ध्वजारोहण हा फक्त शासकीय व प्रशासकीय कार्यलये, शाळा इत्यादी ठिकाणी करण्याची परवानगी होती. 'झेंडा अधिनियम' प्रमाणे २६ जानेवारी २००२ पासून भारतीय ध्वज हा शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्था, धार्मिक संघटना, वित्तीय, सामाजिक सर्व प्रकार च्या संस्था, रहिवाशी सोसायट्या, स्वतःच्या घरावर, सार्वजनीक चौकात आता फडकवण्यात येऊ शकतो. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीम सुरू केली आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर भारतीय तिरंगा ध्वज असावा अशी मा. पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांची संकल्पना आहे असेही यावेळी बोलताना लोणीकर यांनी स्पष्ट केले

"हर घर तिरंगा" अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीम सुरू केली आहे. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोकसहभागाच्या भावनेने साजरा करणे हा या मोहिमेमागील संकल्पना असल्याचे यावेळी लोणीकर यांनी स्पष्ट केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा दि. ९ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे विविध उपक्रम राबवून साजरा होतो आहे. या महोत्सवाचा भाग म्हणून मराठवाडा विभागात “घरोघरी तिरंगा” हा अत्यंत महत्त्वकांशी उपक्रम दि.१३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान राबविण्यत येणार आहे. परतुर विधानसभा मतदारसंघ देखील घरोघरी तिरंगा अभियानासाठी सज्ज असून प्रत्येक राष्ट्राभिमानी व्यक्तीच्या घरावर तिरंगा ध्वज फडकलेला दिसेल.“घरोघरी तिरंगा” हा उत्सव प्रत्येक व्यक्तीचा, कुटुंबाचा व समाजातील सर्वस्तरातील जनतेमध्ये देशाभिमान जागृत करणारा व स्वातंत्र्य संग्रामात हुतात्म्य पत्करलेल्या विरांपासून प्रेरणा घेणारा आहे. हा उत्सव साजरा करताना लोकसहभाग हा या कार्यक्रमाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण त्यात लोकांच्या भावना, विचार व मते जुळलेली आहेत. असेही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.

*ध्वज संहितेचे पालन करत ध्वजारोहण करा - लोणीकर*

“घरोघरी तिरंगा” उपक्रमांतर्गत ग्रामीण भागात ध्वज उपलब्ध करून देण्यासाठी व्यापारी बांधव, विविध संस्था-संघटनांची मदत मिळविण्यात येत आहे. या उपक्रमात ध्वजाची प्रतिष्ठा राखण्यासाठी ध्वजसंहितेचे पालन व्हावे. ध्वज स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी लावावा. सूत, लोकर, पॉलिस्टर, सिल्कचा ध्वज लावता येईल. प्लास्टिकचा असू नये. त्याचा आकार ३×२ असावा. ध्वज मळलेला किंवा फाटलेला नसावा, ध्वजसंहितेचे पालन व्हावे. दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२२ हे तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकवताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरवाची आवश्यकता नाही. मात्र शासकीय कार्यालयांना या संबंधी ध्वजसंहितेचे पालन करावे लागणार असल्याचे देखील माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

*"घरोघरी तिरंगा" उपक्रमाची प्रचार प्रसिद्धी करा - लोणीकर यांच्या प्रशासनासह उपस्थितांना सूचना*

“घरोघरी तिरंगा” उपक्रमाची प्रचार व प्रसिद्धी- सदर उपक्रमाच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी प्रत्येक सरकारी अधिकारी , कर्मचारी , शिक्षक, सेवा मंडळे, लोक प्रतिनिधी यांचा सहभाग व सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये पोस्टर्स व बॅनर्स लावणे, शाळामधुन मुलांच्या स्पर्धा घेणे, प्रभात फेऱ्या काढणे इ. बाबींचा समावेश करण्यात यावा. तिरंगा स्वयंसेवकाच्या नेमणुका करुन त्यांच्या मार्फत कार्यक्रमाची प्रचार प्रसिध्दी व अंमलबजावणी करण्यात यावी. जिल्हास्तरावर मोक्याच्या ठिकाणी म्हणजेच बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालये, धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळी होर्डिंग/बॅनर्स लावण्यात यावेत. जिल्हयातील शासकिय इमारती, ऐतिहासिक वास्तूंना तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात यावी. गावस्तरावरील “घरोघरी तिरंगा” फडकवल्याचे ड्रोनद्वारे फोटो घेणे व व्हिडीओ शुटींग करण्यात यावे. अशा सूचना देखील यावेळी श्री लोणीकर यांनी प्रशासनासह उपस्थितांना केल्या.

“घरोघरी तिरंगा” उपक्रमाची अंमलबजावणी ही दि . ९ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत करण्यात येणार असल्याने यादरम्यान स्वच्छता मोहिम, महिला मेळावे, अर्थ साक्षरता, शेतकरी मेळावे, इ. बाबत तारीखवार कार्यक्रम घेण्यात यावेत, तसेच हा उपक्रम संपूर्ण कोकण विभागात यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन देखील यावेळी श्री लोणीकर यांनी केले. लोकसभागाशिवाय कोणतीही चळवळ यशस्वी होऊ शकत नाही त्यामुळे प्रत्येक राष्ट्राभिमानी व्यक्तीने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असेही लोणीकर यावेळी म्हणाले.

*महिला बचत गटांच्या ध्वजविक्री केंद्राचे लोणीकरांच्या हस्ते उद्घाटन*

महिला बचत गटांच्या वतीने ध्वज विक्री केंद्र उभारण्यात आले त्याचे उद्घाटन मागची मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रत्येक गावातील प्रत्येक घरापर्यंत ध्वज पुरवठा करण्याचे काम केले जाणार असून महिला बचत गटांनी यासाठी पुढाकार घेतला आहे महिला बचत गटांनी ध्वज पुरवठा करण्याचे काम हाती घेतल्या नंतर प्रत्येक घरापर्यंत ध्वज नक्की पोहोचेल अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी महिला स्वयंसहायता बचत गटांचे कौतुक केलं महिला बचत गटाच्या विकासासाठी व त्या माध्यमातून महिला सक्षमीकरण व्हावे यासाठी महिला बचत गटांना कर्जवाटप करून त्यांना सक्षम बनवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे देखील यावेळी लोणीकर यांनी स्पष्ट केले प्राथमिक स्वरूपात भिमाई स्वयंसहायता बचत गट, श्री गणेश स्वयंसहायता बचत गट, सरस्वती स्वयंसहायता बचत गट, महालक्ष्मी स्वयंसहायता बचत गट, प्रहार दिव्यांग बचत गट, रामगुरू बाबा स्वयंसहायता बचत गट, माऊली स्वयंसहायता बचत गट, जय भवानी स्वयंसहायता बचत गट व पंचशील स्वयंसहायता बचत गट या बचत गटांना प्रत्येकी ०१ लाख रुपये कर्ज मंजूर असलेल्या धनादेशाचे वाटप श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले मंठा तालुक्यातील बचत गटांसाठी साधारणतः ०८ कोटी रुपये कर्ज देणे अपेक्षित असून विविध बँकांच्या माध्यमातून लवकरच ते कर्ज सर्व बचत गटांना मिळेल अशी ग्वाही देखील यावेळी श्री लोणीकर यांनी दिली.

यावेळी तहसीलदार कैलास वाघमारे गटविकास अधिकारी थोरात तालुका कृषी अधिकारी श्री राठोड नगरपंचायत मुख्याधिकारी श्री बैरागी प्रल्हादराव दवणे रमेश कोळकर डॉ स्वाती पवार डॉ चाटशे विलास घोडके माऊली घोंडगे कल्याणराव उबाळे महादेव बाहेकर गणेश चव्हाळ भगवान सरकटे माऊली वायाळ मुस्तफा पठाण निवास देशमुख नवनाथ चट्टे राजभाऊ नरवडे अशोक नाना वायाळ अन्साबाई राठोड जयश्री पवार सरस्वती वाघमारे विठ्ठल कदम प्रकाश गबाळे सोपान वायाळ राजभाऊ खराबे गंगाराम हावळे रामकिसन मुसळे दत्ता खराबे विकास राठोड राहुल बाहेकर जितेंद्र सरकटे विक्रम उफाड लक्ष्मण बोराडे शंकर बांडगे आबासाहेब सरकटे पवन केंदळे जानकीराम चव्हाण प्रकाश नानवटे सुधाकर जाधव विनोद राठोड तानाजी शेंडगे खंडू लहाने समंदर पठाण नरेंद्र पवार वन अधिकारी श्रीमती पौळ रवींद्र वाघमारे अनिल मोरे समाधान आघाम संदीप चव्हाण कैलास उबाळे अमोल सोनटक्के अविनाश लोमटे पंजाब वाघ नीता राठोड उज्वला राठोड चंद्रकला पोपटे आशामती गायकवाड शिला जनकवार गंगा काकडे यांच्यासह प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी आशा सेविका अंगणवाडी सेविका महिला बचत गटाच्या कार्यकर्ता लोकप्रतिनिधी पक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात