📰 ताज्या घडामोडी

जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाची गरज –एकनाथ कदम,आनंद विद्यालयात संपन्न झाला दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

Shamsundar chittoda
14 मार्च 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

दहावी शालेय जीवनाची शेवटी पायरी असल्याने या नंतरचे प्रत्येक पाऊल जबाबदारीने टाकणे गरजेचे आहे. इथपर्यंतच्या प्रवासात आपले कुटुंब,आपले शिक्षक आणि इतरांनी आपल्याला वेळोवेळी सहकार्य केले. या नंतरची लढाई मात्र आपल्याला एकट्याच्या हिमतीने लढायची आहे. परीक्षा असो वा जीवनातील एखादी जबाबदारी

यशस्वीरित्या पार पडायची असेल तर कठोर परिश्रमाला पर्याय नाही.आपल्यातील क्षमता ओळखून त्या अधिक बळकट करण्यासाठी, आपली बलस्थाने अधिक भक्कम करण्यासाठी पुढील आयुष्यात आपण कायम प्रयत्नशील असले पाहिजे, असे प्रतिपादन शिवछत्रपती शिक्षण व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष एकनाथ कदम यांनी केले आहे. शनिवारी आनंद विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी आदर्श शिक्षक, गट समन्वयक कल्याणराव बागल, मुख्याध्यापिका सत्यशीला तौर-कदम, संजय कदम आदीची प्रमुख उपस्थिती होती.

दहावी नंतर जीवनातला एक नवा अध्याय सुरु होणार आहे. या प्रवासात अनेक वेळा अनेकांना अपयशाचा सामना कराव लागू शकतो. अशावेळी स्वतःचा आत्मविश्वास आणि संयम न ढळू देता, अपयशावर मात करण्याचा प्रयत्न करावा. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे कधीही विसरता कामानये. कुठलेही यश अपघाताने मिळत नसून त्यासाठी परिश्रम आणि नियोजन करावे लागतेच हा मूलमंत्र कायम स्मरणात ठेवा असे आवाहन पुढे बोलतांना कदम यांनी केले.

यावेळी शाळेतील काही विद्यार्थ्यांनी आपल्या आतापर्यंतच्या शालेय जीवनातील कडू-गोड आठवणीना उजाळा दिला. ज्या शाळेत आपण लहानाच्रे मोठे झालो, ज्या शाळेने आपल्याला अंगाखांद्यावर खेळवले त्या शाळेचा निरोप घेतांना अनेक विद्यार्थ्यांना हुंदका आवरता आला नाही. यावेळी शाळेतील काही शिक्षकांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कदम, विक्रम भांडवलकर, प्रशांत वेडेकर, रमेश लुलेकर, अनुजा गारकर, उदिता उपाध्याय यांच्यासह इतर शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात