📰 ताज्या घडामोडी

जीवनात वावरताना सर्वाच्या हिताच्या रक्षण करा मोठया माणसांचा आदर करा-अनिल महाराज चेके

Shamsundar chittoda
5 फेब्रुवारी 2022⏱️ ४ मिनिटे वाचन
WhatsApp

तळणी : (रवी पाटील ) वाघाळा रामकथा ही परिवर्तनाची कथा आहे जोपर्यन्त माणसाच्या जीवनात परिवर्तन होत नाही तोपर्यन्न माणसाची प्रगती होणार नाही जीवनात वावरताना सर्वाच्या हिताच्या रक्षण करा मोठया माणसांचा आदर करा संस्कारीक जीवन बनवा मिळेल तेवढा वेळ नामस्मरणासाठी खर्च करा तरच या कलयुगात तुम्ही सुखी जीवन जगू शकाल असे प्रतिपादन रामायणाचार्य आनी

ल महाराज चेके यानी केले वाघाळा येथे चालु असलेल्या श्रीराम कथेचा आजचा सांगतेच्या दिवस रामकथेचे निरुपण करताना महाराजांनी रामसीतेच्या आयुष्यातील विविध प्रसंग सांगून मंञ मुग्ध केले प्रभू रामचद्रां सारख्या व्यक्तीमत्व आजच्या मानवी जीवनास एक उर्जा स्त्रोत असुन त्यापासून मनुष्याने आदर्श घेतला पाहीजे रामाची त्यागी प्रवृत्ती व आज्ञाधारक पणा मानवी जीवनामध्ये उपयोगी पडू शकतो तो फक्त आचरणात आणने गरजेचे आहे

लक्ष्मणाचे बंधू प्रेम सर्वश्रूत आहे आजकालच्या भावंडाने ते अंगीकांरले पाहिजे तसे झाले तर प्रत्येक घरामध्ये एकोपा नांदेल रामाला वनवासात पाठवून भरत कधीच राज गादीचा विचार करू शकत नाही मी तेव्हाच राज्य स्वीकारेल जेव्हा मी

माझ्या रामाची भेट घेईल जे राज्य माझ्यासाठी माझ्या मातेने मागीतले ते राज्य माझ्या साठी गौण आहे तीच वृत्तीच भरताच्या बंधू प्रेमाचा दाखला देऊन जाते एरवी सत्ते साठी आजचे राजकारणी या रामकथेचा आदर्श घेतील का राम वनवासातून येई पर्यन्त आपण राज सिंहासनावर बसण्यास काय हरकत हा विचार जेव्हा समोर आला तेव्हा नम्रपणे नकार देणार भाऊच एक जगासमोर आदर्श निर्माण केला तोच आदर्श आज प्रत्येक भावाने घेतला पाहीजे

निसर्गाकडे अजब जादू आहे. निसर्गात अहंकाराचा लवलेश नाही, म्हणूनच निसर्ग ईश्वराच्या नजीक आहे. त्याचमूळे आपण जेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात जातो, तेव्हां ईश्वराच्या जवळ गेल्याचा अनुभव येतो. मायेचा भ्रम दूर होतो. वसंत असो वा वर्षा ऋतूच्या मार्गाने ईश्वरचं सृष्टीवर हात फिरवीत असतो, नजर ठेवून असतो.

जीवनातही असाच प्रभूस्पर्श झाला, ' त्याचं ' हस्त फिरला की जीवनही चैतन्यदायी स्पर्शाने फुलवून निघते. भक्ती आणि शक्तीच्या सहयोगातून जीवन दृष्ठीही निसर्ग सृष्ठी सारखी बहरत जाते. देणारयाचे हात हजार हे निरंतर सत्य आहे. म्हणूनच न मागता 'तो' घेणाऱ्याच्या झोळीत प्रसाद टाकीत असतो.

"नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी लाभली की ती सरस्वतीच्या रुपात स्वानंदला. उत्कर्षाला कारणीभूत होते." आपल्या मनातील श्रद्धा जर बलिष्ठ असेल तर त्याच्या आधारावर अशक्य ते शक्य करता येते. "श्रद्धावान लभते मोक्ष:

"गुरु तेथे ज्ञान, ज्ञान तेथे शहाणपण,शहाणपण तेथे नारायण आणि नारायण तेथे सुख, शांती समाधान ." गुरु शिष्याला आपल्या सारखे करून टाकतात. ज्याला आपला शिष्य आपल्यापेक्षा 'बुद्धिवान' व्हावा असे वाटते, तोच खरा गुरु. दुसऱ्याला काहीही मोबदला न घेता 'गुरुत्व' बहाल करतो तोच खरा गुरु. हल्लीच्या युगात खरे गुरुत्व देणारे दुर्मिळच असतात राजाचा अधिकार असताना सुद्धा गुरु आज्ञेत राहणाऱ्या रामा समोर सपूर्ण भारत वर्ष व विश्व आज रामा समोर नतमस्तक होत आहे

राजा राम जगासमोर एक आदर्श राजा आहे आजही भारत भूमीला रामाच्या नावाने ओळखतात चारीत्र्य काय असते ते कशे जपावे यांचे ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रभू रामचद्र त्यांगाचा आदर्श काय असतो ते रामाकडून शिकावे वडीलांच्या आज्ञेचा आदर हा रामाच्या संस्कांरातून दीसून येतो आज खऱ्या अर्थाने त्या संस्कांरांची गरज तरुण पीढीवर होणे गरजेचे आहे सध्याच्या तरुणांमध्ये न ऐकण्याची प्रवृती वाढत चालल्याने आई वडीलांना अनाथ आश्रमाची वाट धरावी लागते आहे खरे तर आपली भारतींयांची एकत्रीत कृटुंब संस्कृंती लयास गेल्याने प्रेम आपूलकी माणूसकी या गोष्टी आता क्कचीतच पाहावयास मीळत आहे या कलयुगात . तरूणांनी रामाचा आदर्श घेऊनच जगले पाहीजे तरच आपली येणारी पीढी नीतीवान चारीत्र्यवान बनेल असे रामायणाचार्य अनिल महाराज चेके यानी वाघाळा येथील रामकथेच्या सांगते प्रसंगी काढले

श्री भक्त प्रेम वेदांत गुरुवर्य किसन बाबा वाघाळेकर यांच्या तपपूर्ती सोहळ्या निमित्य वाघाळा येथे संगीत रामायण संत तुकाराम महाराज चरिञ व किर्तन सोहळ्याचे मोठे आयोजन करण्यात आले होते ह भ प ज्ञानेश्वर माऊली वाघाळेकर यांच्या नेतूत्वा खाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उद्या ह भ प उमेश महाराज दाशरथे यांच्या काल्याच्या किर्तनाने या सप्ताहची सांगता होणार आहे

या सात दिवसात

रामायणाचार्य अनिल महाराज चेके साथ शालिक्रम महाराज टेकाळे मारुती महाराज पवार गजानन महाराज आदरणीय माऊली महाराज वाघाळे कर व ग्रामस्थाची मोठी उपस्थीती होती

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात