📰 ताज्या घडामोडी

तळणी येथील दत्त जयंती निमित्य चालू असलेल्या अंखड हरीनाम सप्ताह ची सांगता

Shamsundar chittoda
22 डिसेंबर 2021⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

तळणी (रवी पाटील)

येथील दत्त जयंती निमित्य चालू असलेल्या अंखड हरीनाम सप्ताह ची सांगता ह भ प लक्ष्मीकांत महाराज सेवलीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने .झाली तळणी येथील दत्त जयंती उत्सवाला गेल्या ७० वर्षापासूनची पंरपरा सेवलीकर महाराजाच्या किर्तनरूपी सेवेने आजतागायत सूरूच आहे या सात दिवसात रोज सकाळी रामदासी भिक्षा दत्ताञयाचे नित्योपचार आरती नैवेद्य व मानाची पंगत असलेल्या एका भक्ताकडून अन्नदानाची प्रथा गेल्या ७० वर्षापासून पेक्षा जास्त काळापासून सुरूच आहे दत्त जयंती निमित्य श्री विठ्ठल मंदीर येथे सात दीवस हरदासी किर्तनाची सेवा सेवलीकर महांराजांच्या वतीने होत असते त्यांनंतर भोलेनाथ महाराज स्थापीत श्री दत्त मंदीर पुर्णा भोलेनाथा गड येथे सुध्दा गेल्या चाळीस वर्षापासून काल्याच्या किर्तनाची पंरपरा कायम आहे

या काल्याच्या .निमित्याने जगदगूरू तुकाराम महाराज यांच्या *उपजोनिया पुढती येऊ काला खाऊं दहीभात* ॥१॥

*वैकूठी तो ऐसे नाही*

*कवळ काही काल्याचे* II ध्रू॥

*एकमेका देऊमुखी* I

*सुखी घालू हुबंरी* II २॥

*तुका म्हणे वाळवंट* I

*बरवे नीट उत्तम* ll ३॥

या अभंगावर सुंदर निरुपण केले भगवान श्रीकृष्णाने आपल्याला या काल्याची पंरपरा निर्माण करू दीली आहे ती एक प्रकारची भगवंता प्रती असलेली भक्तीच आहे भक्ती साधनाच मनुष्याच्या आयुष्यात सुखाचा मार्ग निर्माण करू शकतात पण त्या भक्ती साधनेत भंगवता कडून जर काही अपेक्षा ठेवली नाही तर तो अपेक्षेपेक्षाही जास्त देणारच यात शंका नाही मनुष्याने केलेली निस्वार्थ भक्ती साधना ही त्या मनुष्याला नक्कीच भगवत प्राप्तीसाठी उपयोगी पडेल पण यासाठी सांसारीक मोह माया यापासून त्याला दुरच राहावे लागेल तर त्या भक्ती साधनेला जास्त महत्व प्राप्त होईल संसारीक आयुष्यातील भक्ती साधना मध्ये स्वार्थ असल्या कारनाने ती साधना भंगवतां प्रिय नसते

जगदगूरू तुकाराम महाराज यांच्या भक्ती साधनेचा आदर्श मनुष्याने थोडाफार घेतला पाहीजे संसारीक सुख विषयांचा त्याग करून भक्ती साधनेला महत्व दीले व इश्वर प्राप्त झाला असल्याने त्याना वैकुठ प्राप्त झाले कठोर भक्ती मार्ग स्वीकारल्याने त्याचे फळ काय असू शकते यांचे उदाहरण म्हणजे ज्ञानोबा तुकोबा आहेत स्वच्छ आचरण व भंगवंता प्रती असलेला निस्वार्थ भक्ती भावामुळेच त्याना देवत्व प्राप्त झाले आहे म्हणूनच आज आपण त्याच्या नतमस्तक होत ऊसतो

कृष्ण चरित्र

भगवान कृष्णाचे चरित्र हे त्यागाचे चरिञ आहे सदैव धर्माची खरी बाजू काय असते हे दाखवण्याचे काम हे कृष्ण चरिञ करीत असते देवाने संव गडया सोबत येऊन केलेला काला मनुष्य जन्मात तुम्हा आम्हाला प्राप्त होतो म्हणजे आपण खरोखरच भाग्यवान आहोत देवाने पुढाकार घेऊन संवंगड्याना केलेले बोबडे उपदेश त्या संवगड्याना अमरत्व जर प्राप्त करून देऊ शकते तर तो काला तुम्ही आम्ही सेवन करायला हरकत काय आहे या काल्याचे अनन्यसाधारण महत्व असून मनुष्य जीवनातील सांसारिक काल्यापेक्षा भक्ती मार्गाने महत्त्व असलेला काला किती तरी पट्टीने श्रेष्ठ असून मनुष्याने तो स्वीकारला पाहीजे कारण भूतला वरचा हा काला वैकूठात सुध्दा नाही म्हणून त्याला महत्व आहे संतानी काल्याचा आदर्श घालून दीला आहे वाळवटांतील काला घेण्यासाठी देवाला सुध्दा अनेक रूपांमध्ये भूतलावर येण्याचा मोह आवरत नाही असा हा उत्तम काला मनुष्य जीवाला प्राप्त झाला असल्याने तो काला प्रत्येकाने जर स्वीकारला तर आत्मीक समाधान मनुष्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही

श्रीकृष्ण परमात्माला गाईचा फार लळा असायचा देवाची गाई फार निष्ठा असायची त्याच गाईना आपण आज संकटात टाकले आहे तीला कसायाच्या दावणीला बांधू नका सांभाळ होत नसेल तर गोरगरीबाला दान देऊन टाका गोशाळेला देऊन टाका तिच्यावर आपणच संकट आनत आहोत जो गाईला ञास देईल त्याला नक्कीच नरक यातना झाल्याशिवाय राहणार नाही शक्यतोवर तिचा सांभाळ करा तुम्हाला ती नक्कीच आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही असे महाराजांनी सांगीतले

या उत्सवासाठी विठ्ठल कोरकणे अंबादास भावसार कल्याण जोशी बाळू पाटील योगेश पाटील नदू पाटील माधवराव सरकटे आदी भक्त मडळीनी परीश्रम केले

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात